चक्क विमानातून येऊन घरफोड्या करायचा ‘हा’ हाय-फाय चोर!

विमानातून येऊन पिंपरी-चिंचवड शहरात घरफोड्या करणाऱ्या हाय-फाय चोरला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. हा चोर पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत असे आणि परिसरात चोरी करायचा.

Pune
pune police arrested thief who use to travel by plane
चक्क विमानातून येऊन घरफोड्या करायचा 'हा' हाय-फाय चोर!

परराज्यातून विमानाने येऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून पिंपरी-चिंचवड शहरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ८ लाख रुपयांचे २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लपटॉप असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अनिल मिश्रि राजभर वय-३६ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला उत्तर प्रदेश मधून अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात दोन दिवसात थेरगाव आणि वाकड परिसरात बंद फ्लॅटमधून एकूण २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप हे भर दिवसा घरफोडी करून लंपास केला होता.


हेही वाचा – घरफोडी आणि चैन स्नॅचिंगचे २४ गुन्हे उघडकीस; ६ जणांना अटक


याप्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. आरोपी हा विमानाने येऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून त्या दरम्यान परिसरातील भागात रेकी करून दिवसा घरफोड्या करायचा.आरोपीचा शोध घेण्यासाठी वाकड पोलिसांनी तीन पथक तयार केली होती. त्यानुसार हॉटेल आणि संशयित आरोपींचा शोध सुरू केला. तेव्हा, एका हॉटेलमध्ये संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्ती विषयी माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे तांत्रिक तपास करत आरोपी अनिलला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने शहरातील दोन्ही घरफोड्या केल्याचे कबुल केले. त्याच्यावर मुंबई आणि पुण्यातील शिवाजी नगर येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली. सदर कामगिरी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली हरीश माने यांच्या पथकाने केली आहे.


हेही वाचा – CCTV Video : पुण्यात मनोरुग्ण महिलेचा राडा; पोलीस, लष्कराला घातल्या शिव्या