घरमहाराष्ट्रपुणे : दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड; १० लाखांचा मुद्देमाला हस्तगत

पुणे : दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड; १० लाखांचा मुद्देमाला हस्तगत

Subscribe

पुण्यात १० लाखांच्या मुद्देमालसह दुचाकी चोरी करणारी टोळीला गजाआड करण्यात यश आले आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीला वाहन चोरी पथक आणि गुन्हे शाखा युनिट तीनने अटक केली आहे. त्यांच्याकडून १० लाख ३० हजार रुपयांच्या ऐकूण १८ दुचाकी आणि एक टेम्पो हस्तगत करण्यात आला आहे. १२ वाहन चोरीचे आणि दोन एटीएम फोडलेले गुन्हे उघड झाले आहेत. याप्रकरणी प्रवीण गोरक्षनाथ गाडे (२६), नितीन मच्छींद्र नेहे (२३), निखिल बाळासाहेब गाडे (२४), हरीश लक्ष्मण गाडे (२५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; पिंपरी-चिंचवड परिसरात दुचाकी चोरांनी हैदोस घातला होता. त्याचबरोबर खालूब्रे आणि खेड येथे एटीएम मशीन फोडून पैसे लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या सर्व गुन्ह्यात सदर टोळीतील आरोपी पोलिसांना हवे होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांचे पथक गस्त घालत असताना पथकातील पोलीस कर्मचारी सचिन उगले आणि विनोद साळवी यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दुचाकी टोळीतील हवे असलेले तीन इसम हे चाकण परिसरातील महेंद्रा कंपनी शेजारी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार एक पथक तयार करण्यात आले. संबंधित ठिकाणी पोलीस दबा धरून बसले. तीन अज्ञात इसम हे दुचाकी वरून आल्यानंतर त्यांना पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अन्य एका साथीदारांसह ग्रामीण आणि शहरी भागात दुचाकी चोरी करत असल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, यातील पोलीस कर्मचारी सचिन उगले यांनी कर्तव्य बजावत असताना आत्तापर्यंत पाचशे पेक्षा जास्त दुचाकी पकडून दिल्या आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांच्यासह सहकाऱ्यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गोव्यातील मौजमजेसाठी ‘त्यांनी’ रचला चोरीचा बनाव; १२ तासात गजाआड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -