घरमहाराष्ट्रपुण्यात अभियंताचा तलावात डोकं आपटून मृत्यू

पुण्यात अभियंताचा तलावात डोकं आपटून मृत्यू

Subscribe

पुण्यातील एका जलतरण तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या संगणक अभियंताचे डोके आपटून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वसई – विरार महापालिकेच्या तरणतलावामध्ये एका आठ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुण्यातील एका जलतरण तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या संगणक अभियंताचे डोके आपटून मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. शाम नितीशकुमार कालरिया (२२) असे मृत्यूमुखी पडलेल्या संगणक अभियंता युवकाचे नाव आहे.

नेमके काय घडले?

पुण्यातील एका जलतरण तलावात संगणक अभियंता शाम नितीशकुमार कालरिया आपल्या मित्रासोबत तलावात पोहोण्यासाठी गेले होते. त्यांनी तलावात सूर मारली. मात्र तलावात पाण्याची पातळी कमी होती हे त्यांच्या लक्षात आले नसल्याने त्यांचे डोके तळाशी असलेल्या फरशीवर आपटले. यामध्ये शाम गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अखेर रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांनी दिली. त्याच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

अभियंता शाम कालरिया यांच्याविषयी

अभियंता शाम कालरिया हे मूळचे अहमदाबादचे असून ते एका बँकेत नऊ महिन्यांपूर्वी अभियंता म्हणून रुजू झाले होते. हर्मेस हेरिटेज सोसायटीत शाम आणि त्याचे मित्र भाडेतत्वावर सदनिका घेऊन ते राहत होते. त्यांच्या या सोसायटीच्या आवारात छोटा जलतरण तलाव होता आणि त्या तलावात त्यांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -