पुण्यात भाचीवर बलात्कार करणाऱ्या काकाला अटक

पुण्यातील धायरी या ठिकाणी एका तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्याकरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हे क्रूरकृत्य करणारा नराधम पीडितीच्या मावशीचा पती असल्याचे समोर आले आहे.

Pune
mahim rape and murder case
माहिम रेप आणि मर्डर केस

पुण्यात एका तरुणीवर घरात घुसून बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले. या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज केला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून पीडितीच्या मावशीचा पती असल्याची माहिती समोर आले आहे. नितीन दामोदर असे आरोपीचे नाव असून हे क्रूरकृत्य करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

पुण्यातील सिंहगड रस्ता भागातील धायरीतील गारमाळ परिसरात एका १७ वर्षीय तरुणीवर गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. पीडितीचे आई – वडील मजुरीचे काम करतात. ते नेमहमीप्रमाणे सकाळी कामावर गेले. ते घरी गेल्यानंतर घरात तरुणी एकटीच होती. त्यादरम्यान पीडितीच्या काकाचे पती घरी आले. घरी कोण नसल्याचा अंदाज घेत त्यांनी तरुणीवर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर या नराधमाने या तरुणीचा शेजारी असलेल्या साडीने तिचा गळा दाबून तिची हत्या केली. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पीडितीचा भाऊ घरी आल्यानंतर त्याला आपल्या बहिणी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. हा घडलेला प्रकार त्यांनी आपल्या आई – वडीलांना सांगितल त्यानंतर आई – वडीलांनी पीडितीला ससून रुग्णालयात दाखल केले. ससून रुग्णालयात पीडितीचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये पीडितीवर बलात्कार करुन त्याची हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता. त्यामध्ये पीडितीच्या मावशीचा पती आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांता तपास केला असता त्या नराधमाने हे क्रूरकृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.


वाचा – पुण्यात तरुणीवर बलात्कार करुन केली हत्या


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here