घरमहाराष्ट्र'कोरेगाव भीमात पुन्हा दंगलीची शक्यता'

‘कोरेगाव भीमात पुन्हा दंगलीची शक्यता’

Subscribe

सरकारने कोरेगाव भीमा दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्वरित पावलं न उचलल्यास, यंदा पुन्हा दंगल होऊ शकते असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे.

सरकारने कोरेगाव भीमा दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्वरित पावलं उचलली नाहीत, तसंच विनाकारण उपद्रव करणाऱ्या गावगुंडांना अटक केली नाही तर यंदा पुन्हा कोरेगाव भीमात दंगल घडू शकते, असा इशारा 

वाचा: पुण्यात ३० डिसेंबरला ‘भीमा कोरेगाव संघर्ष महासभा’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक इंदू मिलमध्ये बांधण्यात यावे आणि त्याला ‘स्टॅचू ऑफ इक्वीलीटी’ असं नाव दिलं जावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. इंदू मिलमधील हे स्मारक उभारण्याची मागणी खूप पूर्वीच केली असून, सरकार हे स्मारक बांधण्यात प्रचंड दिरंगाई करत आहे, असंही ते म्हणाले.  सरकारला स्मारक बांधणं शक्य नसेल तर त्यांनी ती जमीन आमच्या ताब्यात द्यावी. आंबेडकरी जनता त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या लौकिकाला साजेसं स्मारक बांधेल, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, ३० डिसेंबर रोजी एसएसपीएमएस मैदानात भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची सभा होणार आहे. या सभेनंतर ३१ डिसेंबर रोजी चंद्रशेखर आझाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘आंबेडकरी चळवळ’ या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. ‘संवाद आंबेडकरी तरुणांशी’ असं या चर्चासत्राचे नाव आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -