घरमहाराष्ट्रपुण्यात पाकिस्तानी झेंड्यासोबत 'लायटर फ्री'

पुण्यात पाकिस्तानी झेंड्यासोबत ‘लायटर फ्री’

Subscribe

पुलवामा जिल्ह्यातील या भ्याड हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त केला जात असताना पुण्यात देखील या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. पुण्यातील मुरुड या ठिकाणी पाकिस्तानाचे झेंडे जाळण्यासाठी नागरिकांना मोफत लायटर दिले जात आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात CRPF चे ४० हून अधिक जवान शहीद झाले आहेत तर अनेक जवान जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्लाचा देशभरातून निषेध केला जात असतानाच पुण्यात देखील पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर मोफत दिले जात आहे.

पाकचे झेंडे घ्या आणि जाळा

पुलवामाच्या या हल्ल्यानंतर संपूर्ण देश पेटून उठला आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. तसेच देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनात पाकिस्तानचा प्रतिकारात्मक झेंडा जाळण्यात आला आहे. तसेच पुण्यातील मुरुडकर झेंडेवाल्यांनी पाकविरोधी आंदोलन करण्यासाठी मुरुडकरांना पाकचे झेंडे घ्या आणि ते जाळा म्हणत त्यांना झेंड्यासोबत लायटर देखील मोफत देत निषेध व्यक्त केला जात आहे. दुकानदारांचा हा तीव्र निषेध पाहून मुरुडकरांनी देखील दुकानात मोठी गर्दी केली आहे. मुरुडकर झेंडेवाले हे पुण्यात प्रसिद्ध झेंडे व्यापारी असून त्यांच्या दुकानात झेंडे घेण्यास नागरिकरांनी एकच गर्दी केली आहे. तसेच बऱ्याच मुरुडकरांनी पाकिस्तीनी झेंडे घेत त्यासोबत मिळालेल्या लायटरने झेंडे पेटवले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Live update : दहशतवाद्यांना शिक्षा होणारच – मोदींचे आश्वासन

हेही वाचा – महाराष्ट्रातील वीरपूत्रांवर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार होणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -