घरमहाराष्ट्रपुण्यात हुडहुडी; पारा ५.९ अंशांवर

पुण्यात हुडहुडी; पारा ५.९ अंशांवर

Subscribe

पुण्यातील नागरिक चांगलेच गारठले आहेत. गेल्या दहा वर्षांतील सर्वांत कमी म्हणजेच ५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

डिसेंबरचा महिना देशवासियांसाठी आल्हाददायक ठरत आहे. कारण अनेक राज्यांमध्ये गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे. मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुण्यात थंडीची लाट आली आहे. पुण्यात शनिवारी सकाळी गेल्या दहा वर्षांतील सर्वांत कमी ५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरपेक्षा कमी तापमान पुण्यात नोंदविण्यात आले आहे. तर नागपूरमध्ये राज्यातील नीचांकी ३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दिवसभर गारवा आणि सायंकाळनंतर वाढत गेलेल्या थंडीच्या कडाक्याने पुणेकरांना हुडहुडी भरली आहे.

राज्यात थंडीची लाट

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्याला हुडहुडी भरली आहे. विदर्भामध्ये देखील थंडीची लाट आली असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय; तर कोकण – गोव्याच्या काही भागांत किंचित घट झाली आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीने नागरिक गारठले आहेत.

- Advertisement -

पुणे गारठले

पुण्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. दिवसभरात ५.९ अंश सेल्सिअस किमान आणि २६.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुणे गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात असून अनेकांनी पहाटे बाहेर फिरायला जाण्यास सुट्टी दिली आहे. दिवसभर गार वारे असल्याने दिवसभर लोक स्वेटर घालून फिरत आहेत. तर अनेक नागरिक गरमगरम वाफाळलेला चहा पिताना दिसत आहेत. हा थंडीचा गारठा दोन दिवस कायम राहणार आहे. तर विदर्भाच्या काही भागांत आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुण्यातील १० वर्षांतील तापमान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -