घरमहाराष्ट्रअरेच्चा; महिलेने चंद्रावर खरेदी केली जमीन; एक एकर ५० हजार रुपये!

अरेच्चा; महिलेने चंद्रावर खरेदी केली जमीन; एक एकर ५० हजार रुपये!

Subscribe

चंद्रावर जमीन खरेदी करण्याचे आमिष दाखवून एका महिलेला ५० हजार रुपयाला फसवल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र त्या महिलेची तक्रार दाखल करुन घेण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

चंद्रावर जमीन खरेदी करुन देतो असे आमिष दाखवून एका पुण्यातील महिलेची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात राहणाऱ्या राधिका दाते – वाईकर यांनी चक्क चंद्रावर १३ वर्षांपूर्वी जागा विकत घेतली. त्यांनी एक एकर जागेसाठी ५० हजार रुपये भरले होते. मात्र, त्याबाबत चौकशी केली असता चंद्रावर जमीन कोणी विकत नसल्याचे समोर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र त्यांची तक्रार दाखल करुन घेतली नाही.

नेमके काय घडले?

पंजाब येथील एका व्यक्तीने लुनर फेडरेशनच्या माध्यमातून चंद्रावर जागा खरेदी केल्याची बातमी राधिका यांनी एका वृत्तवाहिनीवर पाहिली. चंद्रावर जागा खरेदी करायची असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा, अशी जाहिरात करण्यात आली होती. राधिका यांनी संबंधित संस्थेशी संपर्क साधला. या संस्थेने त्यांना ६ नोव्हेंबर २००५ रोजी ५० हजार रुपये ऑनलाइन भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे राधिका या महिलेने एक एकर जागा खरेदी करण्यासाठी ऑनलाइन ५० हजार रुपयाची रक्कम भरली. त्यानंतर त्या महिलेने संबंधित संस्थेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या संस्थेचा फोन लागत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. परंतु पोलिसांनी या महिलेची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे.

- Advertisement -

वाचा – चंद्रावर पडलेला पहिल्या बुटाचा लिलाव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -