घरमहाराष्ट्रपुणे विभागात ९८६ किडनी, ३७६ लिव्हर, १५ हार्टची गरज

पुणे विभागात ९८६ किडनी, ३७६ लिव्हर, १५ हार्टची गरज

Subscribe

बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे किडनी खराब होणे, त्याचबरोबर हार्टअटॅक, लिव्हर आदींचे रुग्ण आपणास समाजात वावरताना दिसतात.

बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे किडनी खराब होणे, त्याचबरोबर हार्टअटॅक, लिव्हर आदींचे रुग्ण आपणास समाजात वावरताना दिसतात. पुणे झोनल ट्रान्सप्लांट कमिटीकडे पुणे विभागात ९८६ किडनी, ३७६ लिव्हर , १५ हार्ट यांची गरज आहे. मात्र खूप कमी प्रमाणात अवयवदान होत आहे.

सोलापुरात अवयवदानाविषयी जागृती निर्माण होत आहे. ही जागृती मोठ्या प्रमाणात व्हावी अशी तज्ज्ञांची माफक अपेक्षा आहे. अवयव दान म्हणजे व्यक्तीचा मेंदू मृत झाला तर त्याचे इतर अवयव इंजेक्शन, औषधांच्या सहायाने चालू असतात. ते अवयव चांगल्या स्थितीत असतील, त्या रुग्णाला मधुमेह, कर्करोग, एचआयव्ही आजार नसेल तर ते अवयव आपण घेऊ शकतो. घेतलेले अवयव दुसर्‍या व्यक्तीला बसवू शकतो. सोलापुरात अवयव दानाची चळवळ गती धरत आहे. मात्र हे प्रमाण आणखी वाढण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये ही जागृती मोठ्या प्रमाणात व्हावी. त्याशिवाय अवयव दान करण्याचे प्रमाण वाढणार नाही.

- Advertisement -

महापालिकेच्या वैद्यकीय विभागात सोडले डुक्कर

पिंपरी । पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा आणि डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. वारंवार प्रशासनाला तक्रार करून देखील यावर कोणतेही पाऊल उचलत नसल्याने सोमवारी शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी वैद्यकीय विभागात डुक्कर सोडले. यामुळे सर्वच अधिकारी अचंबित झाले.पिंपरी-चिंचवड परिसरात डुक्कर आणि कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर प्रशासनाला कारवाई करण्यासंदर्भात तक्रार करून देखील प्रशासन ढिम्म आहे. त्यामुळे शिवसेनच्या कार्यकर्ते आणि सचिन भोसले यांनी चक्क वैद्यकीय विभागातच डुक्कर सोडले. जनतेच्या आरोग्याशी खेळत असलेल्या प्रशासनाने तात्काळ यावर तोडगा काढावा अन्यथा महापालिका सभागृहात डुक्कर सोडू असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेतल्याची घटना दिवसेंदिवस घडत आहे. शहरातील परिसरात अक्षरशः कुत्र्यांची आणि डुकरांची दहशत निर्माण झाली आहे.शहरात कुत्र्याने चावा घेतल्याच्या सरासरी १५ ते २० घटना घडत आहेत.त्याच प्रकारे डुक्करांची संख्या देखील शहरात वाढली असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. मात्र इतके करूनसुद्धा महापालिका प्रशासनाला भटक्या कुत्र्यांवर आणि डुकरांवर आळा घालण्यात अपयश येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -