घरमहाराष्ट्रसामाजिक बांधिलकीतून आदिवासी कुटुंबाला मदत

सामाजिक बांधिलकीतून आदिवासी कुटुंबाला मदत

Subscribe

सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून भोरगिरी येथील आदिवासी कुटुंबाला ५० हजार रुपयांची रोख मदत देण्यात आली.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात काम करत असताना प्रत्येक माणसात सामाजिक बांधिलकी जिवंत असायला हवी. अडचणी किंवा गरजेच्या वेळी प्रत्येक कुटुंबाला मदतीचा हात मिळाला तर त्यातून हे कुटुंब पुन्हा नव्याने उभे राहते. नेमकी हीच बांधिलकी जपत जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, यांनी भोरगिरी येथील आदिवासी कुटुंबाला ५० हजार रुपयांची रोख मदत देऊ केली. या कुटुंबातील तीन जणांचा कर्जत येथे विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. भोरगिरी येथील काटे हे आदिवासी कुटुंब कर्जत तालुक्यातील कुडाळमध्ये कामानिमित्त राहण्यासाठी होते. दिवाळीत पाडव्याच्या दिवशी ओढ्यावर मासेमारी करण्यासाठी गेले असता नदीपात्रामध्ये पडलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून पती पत्नी व मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला होता. काठे कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे संपूर्ण कुटुंब आर्थिक अडचणीचा सामना करत होते. गावातील नागरिकांच्या मदतीने जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्याहस्ते काठे कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची रोख स्वरुपातील मदत करण्यात आली. मयत मुलाची आई पार्वताबाई सोमा काटे यांनी ही रक्कम स्विकारली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख सचिन लांडगे नितीन सैद पंचशील फलके व भोरगिरी येथील नागरिक उपस्थित होते.

ऐन दीवाळीच्या काळात भोरगिरी येथील काठे कुटुंबियांवर काळाने घाला घातला. या कुटुंबाला करण्यात आलेल्या मदतीवरुन आजही सामाजिक बांधिलकी जिवंत असल्याचं स्पष्ट झालं आहे. काटे कुटुंबियांना मदत म्हणून दिलेले ५० हजार रुपये त्यांच्या उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडतील, असा विश्वास ग्रामस्थांनी आणि जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

वाचा: ‘ठाण्याच्या कचऱ्यावर पोसली जातेय शिवसेना’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -