पुण्यातील सर्वच टेकड्या वाचविण्यासाठी पुणेकर एकवटले

पाषाण-बाणेर टेकडीसह पुण्यातील सर्वच टेकड्या वाचविण्यासाठी उद्या बैठक

Pune
पुण्यातील सर्वच टेकड्या वाचविण्यासाठी पुणेकर एकवटले

पाषाण-बाणेर टेकडीसह पुण्यातील सर्वच टेकड्या वाचविण्यासाठी उद्या शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वपक्षीय नेते, स्मार्ट सिटी, पुणे महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, टेकडी वाचवण्यासाठी प्रयत्न करणा-या संस्था आणि नागरिक या बैठकीला उपस्थित असणार आहेत.

औंध येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलामंदिरात शनिवारी सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. मागील सहा महिन्यांपासून बाणेर-पाषाण टेकडी विकास व सौंदर्यीकरणाच्या नावाखाली धोक्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी एप्रिलमध्ये होत असलेली टेकडीफोड थांबवली होती. परंतु, १५ जून पासून पुन्हा स्मार्ट सिटी अंतर्गत टेकडी फोडण्याचे काम चालू केले आहे. नागरिकांनी एकत्रित येऊन ते तूर्तास थांबवण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, अंतिम निर्णय नागरिक व संबंधित अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत शनिवारी घेण्यात येणार येईल. या टेकडीच्या विकासाकरिता आणि या टेकड्यांच्या सौंदर्याकरिता बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.