घरमहाराष्ट्रपुरूषांनी घरकाम करायला हवं; पुणेकर महिलांची मागणी

पुरूषांनी घरकाम करायला हवं; पुणेकर महिलांची मागणी

Subscribe

पुरुषांनीही समान वाटा उचलावा महिलांची अपेक्षा, 'इग्नायटिंग अॅस्पिरेशन्स' या सर्वेक्षणातून झाले स्पष्ट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना Work From Home करण्याला परवानगी दिली होती. यामुळे दिवसभरातील कित्येक तास घरातील पती-पत्नी एकमेकांसोबत होते. यादरम्यान, पुरूषांसह कित्येक महिला देखील Work From Home करत होत्या. ऑफिसचं काम सांभाळून घर काम करणं महिला वर्गासाठी धावपळीचं होतं. त्यामुळे अनेक पती-पत्नींमध्ये वाद होऊन त्यांचा वाद विकोपला गेला अन् घटस्फोटापर्यंतही काही प्रकरण पोहोचले. दरम्यान, तरूण पुरूष महिलांना घरकामात मदत करतात. तर या घरगुती कामात पुरूषांनी मदत करताना समान वाटा उचलावा, अशी इच्छा पुण्यातील ९० टक्क्यांहून अधिक महिलांनी व्यक्त केली तर यासह राज्यातील अन्य मोठ्या शहरांमधीलही दहा पैकी नऊ महिलांनी हीच अपेक्षा व्यक्त केल्याचे समोर आले आहे.

पुरुषांनीही समान वाटा उचलावा महिलांची अपेक्षा

मिळालेल्या माहितीनुसार पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर आणि औरंगाबाद या शहरांमधील १२०० महिलांचे सर्वेक्षण यात करण्यात आले. ‘इग्नायटिंग अॅस्पिरेशन्स’ या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. केलेल्या सर्वेक्षणातून असे समोर आले की, राज्यातील मोठ्या शहरांमधील १० पैकी ९ महिलांनी घरगुती कामांमध्ये पुरुषांनीही समान वाटा उचलावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या सर्वेक्षणातील महिलांपैकी तरुण महिलांमध्ये हा विचार सर्वाधिक दिसून आला. कोल्हापूरमधील ९५ टक्के, पुणे आणि ठाण्यामधील ९४ टक्के आणि नाशिक आणि नागपूरमधील ८९ टक्के महिलांनी ही अपेक्षा व्यक्त केल्याची माहिती मिळतेय.

- Advertisement -

सर्वेक्षणात असे झाले स्पष्ट

‘इग्नायटिंग अॅस्पिरेशन्स’ या सर्वेक्षणातून असे स्पष्ट झाले की, या शहरांपाठोपाठ द्वितीय श्रेणीतील शहरातील महिलांनीही पुरुषांनीही घरातील कामांमध्ये सहाय्य करावे, अशी इच्छा व्यक्त केली. २१ ते २५ वयवर्ष असणाऱे तरूण ७४ टक्के महिलांना घरकामात अधिक मदत करतात. यासह ठाणे येथील ९९ टक्के, नवी मुंबईतील ९० टक्के, मुंबईतील ८२ टक्के आणि पुणे येथील ८० टक्के महिलांना घरातील कामांसाठी पुरुषांचे सहकार्य मिळतेय. वयवर्ष ४० ते ४५ असणाऱ्या ६१ टक्के महिला आपला सर्वाधिक वेळ घरातील कामं आणि मुलांची काळजी घेण्यात घालवतात. तर नाशिक, सोलापूर आणि पुणे या शहरांतील महिलांना रोजच्या घरगुती कामांतून अर्धा तास जरी मिळाला तरी स्वत:ची आवड जपासता येईल. आपली आवड जपण्यासाठी ३७ टक्के महिलांना कुटुंबीयांकडून अधिक पाठिंबा आणि प्रोत्साहनाची अपेक्षा असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -