नगरसेवकावर गोळीबार करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

पिंपरी-चिंचवडमधील एस. ए. बॉईज या टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे.

firing on PSI in pimpari chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये गोळीबार

पिंपरी-चिंचवडमधील एस. ए. बॉईज या टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे. जून महिन्यात टोळीतील तिघांनी योजना करून नगरसेवक खंडेलवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. यातून ते थोडक्यात बचावले होते. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सण १९९९ अंतर्गत संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात आली. एस. ए. बॉईज या टोळीचा प्रमुख साबीर समीर शेख (वय १९), सदस्य, जॉनी उर्फ साईतेजा शिवा चिंतामल्ला (वय १९) यांना देहूरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर आफताब समीर शेख हा फरार असून त्याचा देहूरोड पोलीस शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांनी एस. ए. बॉईज नावाची टोळी प्रस्थापित केली आहे. यामुळे देहूरोड परिसरात यांना नागरिक घाबरतात. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सण १९९९ अंतर्गत संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. तिघांवर नागरिकांना लुटणे, गोळीबार करणे, दहशत माजवणे, खुनाचा प्रयत्न करणे, चोरी करणे असे गंभीर गुन्हे आहेत. यातील आरोपींकडे अनेकदा पिस्तुल देखील देहूरोड पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत. यातील आरोपी साबीर हा लहान पणापासूनच चोऱ्या करत होता. त्याने स्वतःची टोळी काढली आहे.

हेही वाचा –

चांद्रयान २ चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु

Video: गाजर ज्यूस पित असाल तर सावधान!