घरमहाराष्ट्रकंपनीतील स्फोटात दोन कामगार ठार

कंपनीतील स्फोटात दोन कामगार ठार

Subscribe

पुणे विभागातील बातम्या वाचा एका क्लीकवर.....

शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील पी. वाय. एन. अ‍ॅटो कंपनीमध्ये गुरुवारी सकाळच्या सुमारास मशीनचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. रुपेशकुमार ब्रिजकिशोर सिंग (वय २८ वर्षे रा. जलपूरवा, ता. शिवान, बिहार) आणि काळूराम किसन साळुंके (वय ४५ वर्षे रा. शिक्रापूर, ता. शिरूर) असे मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत

शिरुर तालुक्यातील सणसवाडी रांजणगाव या परिसरात मोठे उद्योग आणि कंपन्यांचे जाळे आहे. या परिसरात मोठ्या संख्येने कामगार काम करत असतात. कंपनीतील मशिनवर काम करत असताना त्या कामगारांना सुरक्षेच्यादृष्टीने अद्यावत यंत्रणा पुरविली जात नाही. या परिसरातील कंपनींमध्ये कामगारांचे अपघात होऊन मोठी हानी होत असल्याच्या घटना यामागे घडल्या आहे.  सणसवाडी येथील पी. वाय. एन. अ‍ॅटो कंपनीमध्ये एकूण सत्तर कामगार असून या कंपनीमधील काम हे शिफ्टमध्ये चालते. गुरुवारी सकाळी पहिल्या शिफ्टमधील कामगारांचे काम चालू असताना मशीनचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात रुपेशकुमार सिंग आणि काळूराम साळुंके हे दोघे गंभीर जखमी झाले. यावेळी रुपेशकुमार यास शिक्रापूर येथील सूर्या रुग्णालयात आणि काळूराम साळुंके यास वाघोली येथील क्रीटीकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. परंतु, रुपेशकुमार याचा उपचारापूर्वीच तर काळूराम साळुंके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान घटनेची माहिती कंपनीचे सुपरवायझर सचिन ज्ञानेश्वर सावंत यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली. शिक्रापूर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून या घटनेचा तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

शिवसेनेकडून कदम यांचा निषेध

पिंपरी-चिंचवड ।  घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध शुक्रवारी राज्यात आणि केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने पिंपरी-चिंचवड येथे केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात आलेल्या आंदोलकाने आमदार राम कदम यांचे छायाचित्र असलेले फलकावरील हात कलम करण्यात आले. पिंपरी-चिंचवडच्या आंबेडकर चौक येथे शिवसेना पक्षाने शुक्रवारी बेताल वक्तव्याचे बादशाह आमदार राम कदम यांचे हात कलम करत निषेध नोंदवला.यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.गाढवाच्या तोंडाला राम कदम यांचे फलक लावले होते.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात आलेल्या आंदोलकाने आमदार राम कदम असलेल्या फलकावरील त्यांचे तलवारीने हात कलम केले.


स्वाईन फ्ल्यूबाबत जनजागृती करा

पिंपरी-चिंचवड | स्वाईन फ्ल्यू या आजारावर प्रतिबंध हेच मुख्य औषध असल्याने याबाबत व्यवस्थित नियोजन करून जनजागृती करण्यात यावी,अशा सूचना राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी दिल्या आहेत. शहरात जानेवारी पासून १४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक ऑगस्ट महिन्यात स्वाईन फ्ल्यूने उग्र रूप धारण केले असून दहा जणांचा मृत्यू झाला आहे.याच स्वाईन फ्ल्यू संदर्भात घेण्यात आलेल्या विभागस्तरीय तातडीच्या बैठकीत खासदार अमर साबळे यांनी या सूचना दिल्या. यावेळी आयुक्त श्रावण हार्डीकर, प्रवीण आष्टीकर, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ.रॉय आदी उपस्थित होते. खासदार साबळे म्हणाले, स्वाईन फ्ल्यू हा आजार गंभीर स्वरूपाचा असला तरी त्यावर योग्य वेळेत उपचार केल्यास तो निश्चित बरा होतो. एच 1 एन 1 या विषाणूमुळे हा आजार पसरतो. साधा फ्ल्यू व स्वाईन फ्ल्यू यांची लक्षणे एकसारखीच असल्याने स्वाईन फ्ल्यू आजाराची त्वरीत निदान करूण त्यावर वेळीच उपचार केले जात नाही. त्यामुळे हा आजार वाढून नियंत्रणात आणण्यास अवघड होते आणि अशा रूग्णांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.

- Advertisement -

बिबट्याचा अपघातात मृत्यू

पुणे । गेल्या अनेक दिवसांपासुन घनदाट जंगलात वास्तव्य करणारा बिबट्या आता मानवी वस्तीच्या जवळपास वास्तव्य करणारा वन्यप्राणी होत चालला आहे. लोकवस्तीजवळ शिकारीच्या शोधात बिबट्याचा वावर वाढत असताना रस्ते अपघातात बिबट्यांच्या मृत्युचे प्रमाण वाढू लागले आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास नगर कल्याण महामार्गावर पिंपरी पेंढार गावाजवळ अज्ञात वाहनाची धडक लागल्याने एका बिबट्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. चार दिवसांपुर्वी डिंगोरे गावाजवळ अज्ञात वाहनाच्या अपघातात बिबट्याचा मृत्यु झाला होता. जंगल नाहिसे होऊ लागल्यामुळे शिकारीसाठी बिबट्या मानवी वस्तीच्या आसपास फिरू लागले आहेत. हे बिबट्या पाळीव प्राण्यांची शिकार करून आपले पोट भरतात.

मात्र शिकारीच्या मागे फिरताना बिबट्याचे अपघात होत आहेत. एकाच आठवड्यात दोन बिबट्यांचा अपघाती मृत्यु झाला आहे. अनेक ठिकाणी बिबट्या आणि गावकर्‍यांमध्ये संघर्ष होत असला तरी बिबट्याच्या मृत्युमुळे जुन्नर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नगर-कल्याण महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासुन अनेक बिबट्यांचा रात्रीच्या सुमारास अपघात होत आहे. या महामार्गावरुन रात्रीच्या सुमारास अवजड मालवाहतुक करणार्‍या गाड्या भरधाव जातात. गाड्या जात असताना त्यांचा प्रकाश दिसला की, हा बिबट्या रस्ता पार करण्याचा प्रयत्न करतो मात्र भरधाव येणारी गाडी त्या बिबट्याचा जीव घेऊनच पुढे जाते. जुन्नर परिसरात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातुन नगर-कल्याण महामार्गालगत असणार्‍या गावांमध्ये शिकारीच्या शोधात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे विचित्र अपघातात बिबट्यांचे बळी जातात.हे टाळण्यासाठी “महामार्गावर बिबट्याचा वावर वाढला” अशा पद्धतीचे होल्डिंग लावण्याची आवश्यकता आहे. त्यातरीही अपघात होत असेल तर तात्काळ वनविभाग किंवा बिबट निवारा केंद्राला तातडीने संपर्क करावा जेणेकरुन अपघातात जखमी बिबट्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करता येईल असे बिबट निवारण केंद्रांचे डॉ अजय देशमुख यांनी सांगितले.


एफटीआयआय पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात

ftiपुणे | एफटीआयआयमध्ये ’कबीर कला मंच’वर आधारित असलेल्या एका माहितीपटाचे स्क्रिनिंग रद्द करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या एका गटाकडून करण्यात येत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दबावाखाली येऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मात्र, माहितीपटाच्या सार्वजनिक स्क्रिनिंगविषयी कुठलीच माहिती देण्यात आली नसून सेंसॅार प्रमाणपत्राचाही घोळ असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.कबीर कला मंच ही डाव्या विचारांची एक संघटना आहे. या संघटनेमधील काही सदस्यांना माओवाद्यांशी संपर्क असल्याच्या आरोपाखाली अटक झालेली आहे.फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)मध्ये शेवटच्या वर्षांत शिकत असलेल्या हरिशंकर नचिमुथू या विद्यार्थ्याने हा माहितीपट बनवला आहे. ’होरा’ असे या माहितीपटाचे नाव आहे. या माहितीपटाचे स्क्रिनिंग होणार होते. मात्र, सुरक्षेच्या कारणाहून प्रशासनाने सदर स्क्रिनिंग रद्द केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या आरोपाचे खंडन करत आम्हाला याविषयी कुठलीच माहिती नसल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -