रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगाराला अटक

विक्रांत सुभाष कांबळे वय-२० अस अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

mumbai
गुन्हेगार
देहूरोड परिसरातील रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी पिस्तुलासह अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी पाचच्या सुमारास वाकड परिसरातील कस्पटे वस्ती येथे करण्यात आली. विक्रांत सुभाष कांबळे वय-२० अस अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण कस्पटेवस्ती कडून एम.एच- १२ क्यू.एक्स- ९४६८ या क्रमांकाच्या बुलेटवरून हिंजवडीच्या दिशेने जात असून त्याच्याकडे पिस्तुल आहे. अशी गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक हनुमंत बांगर यांना मिळाली. त्यानुसार वाकड पोलिसांनी वाकड ब्रिज जवळ सापळा रचून सराईत गुन्हेगार विक्रांत कांबळे ला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता ११ हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले. त्यानुसार त्याच्यावर विनापरवाना पिस्तुल बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो रावण साम्राज्य टोळीचा गुन्हेगार असल्याच पोलिसांनी सांगितले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरीश माने आणि हनुमंत बांगर यांच्या पथकाने केली आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.