घरट्रेंडिंगमुंबई सीपी पदासाठी मातोश्रीला मुजरा अन् दिल्ली वारीही

मुंबई सीपी पदासाठी मातोश्रीला मुजरा अन् दिल्ली वारीही

Subscribe

'सीपी' पदासाठी आयपीएस लॉबित जोरदार स्पर्धा

मुंबई पोलिसांमध्ये मानाचे स्थान असलेल्या मुंबई पोलिस आयुक्त पदासाठी आता पुन्हा एकदा जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. विद्यमान मुंबई पोलिस आयुक्त हे येत्या २९ फेब्रुवारीला निवृत्त होत असल्याने आता सीपी पदासाठी आयपीएस लॉबीमध्ये पुन्हा एकदा स्पर्धा सुरू झाली आहे.

sanjay barve
मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे

सध्या पोलिस दलात मुंबईच्या सीपी पदाची धुरा कोण सांभाळणार यासाठीची खमंग चर्चा रंगली आहे. सीपी पदाचा मानाचा तोरा रोवण्यासाठी आता राजकीय नेत्यांकडून कशी वर्दी लागेल यासाठीच्या हालचाली राज्य सरकारपासून ते केंद्रातही सुरू झाल्या आहेत. विद्यमान पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना निवृ्त्तीनंतर काही दिवसांची मुदतवाढ मिळाली होती. त्यामुळे सीपी पदासाठीची लॉबिंग काही दिवसांसाठी मंदावली होती. पण आता पुन्हा एकदा या पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

- Advertisement -

हे आहेत दावेदार

संजय बर्वे यांच्यानंतर आयपीएस लॉबितील अनेक बडे अधिकारी या पदासाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये परमबीर सिंह, सदानंद दाते, रश्मी शुक्ला, हेमंत नगराळे, के व्यंकटेशम ही नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. अगदी मातोश्रीला मुजरा करण्यापासून ते दिल्लीतल्या वाऱ्याही सुरू झाल्या असल्याचे कळते. एका अधिकाऱ्याने साध्या वेशातही मातोश्रीला भेट दिल्याने या चर्चांना उधाण आले आहे. तसेच काही अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या बंगल्यातील भेटीही वाढवल्या असल्याचे कळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -