घरमहाराष्ट्रकणकवलीत भाजप - स्वाभिमानमध्ये राजकीय राडा

कणकवलीत भाजप – स्वाभिमानमध्ये राजकीय राडा

Subscribe

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे. आघाडीच्या राजकीय पक्षाचे नेते प्रचारसभांदरम्यान एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसत आहेत. तर, काही राजकीय नेत्यांमध्ये ‘ट्वीटर वॉर’ रंगताना दिसत आहे. दरम्यान, आज कणकवलीमध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे आणि भाजपाचे युवा नेते संदेश पारकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. भाजप आणि स्वाभिमानचे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या हमरी-तुमरीमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यादरम्यान पारकर यांच्या घराबाहेर तोडफोडही करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कणकवलीतील महाविद्यालयात बुधवारी दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्यामुळे काही वेळातच राजकीय वातावरण तापले. आधी कणकवली महाविद्यालयाच्या मैदानात राडा झाला आणि त्यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे व संदेश पारकर यांच्या गटापर्यंत हा वाद पोहोचला. वाद वाढत गेल्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले आणि वातावरण तणावपूर्ण झाले.

वाद विकोपाला पोहचल्यानंतर पारकर यांच्या घराबाहेरच्या दुचांकींची तोडफोड करण्यात आली. काही वेळातच पोलिसांटी टीम घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. समीर नलावडे हे स्वाभिमान पक्षाचे नेते असून ते सध्या नगराध्यक्ष आहेत. दरम्यान, नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामटतेकर, स्वाभिमान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्रींसह अन्य अधिकाऱ्यांनी या राड्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तर दुसरीकडे सेना आमदार वैभव नाईक यांनी पारकरांच्या घरी भेट दिली आणि एकंदर परिस्थीतीचा आढावा घेतला. सध्या या राजकीय राड्यामुळे कणकवलीमध्ये तणावपूर्ण वातावरण पसरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -