घरमहाराष्ट्रवडील काँग्रेसचे स्टार प्रचारक तर मुलगा भाजपचा 'स्टार' उमेदवार

वडील काँग्रेसचे स्टार प्रचारक तर मुलगा भाजपचा ‘स्टार’ उमेदवार

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घराणेशाहीचे अजब चित्र सर्वच पक्षांमध्ये दिसत आहे. वडील एका पक्षात तर मुलगा दुसऱ्या पक्षात असे चित्र या निवडणुकीत सर्रास पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ च्या महाराष्ट्रातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि प्रियंका गांधी यांचा या यादीत समावेश आहे. दक्षिण अहमदनगरच्या जागेवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे नाराज होते. अहमदनगरची जागा मिळाली नसल्यामुळे सुजय विखेने भाजपप्रवेश केल्यामुळे काँग्रेसला धक्का बसला तर सुजय भाजपचा ‘स्टार’ उमेदवार बनला. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा उल्लेख असल्यामुळे आता वडील एका पक्षाचे स्टार प्रचारक तर मुलगा दुसऱ्या पक्षातून उमेदवार, असे अजब चित्र दिसत आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी ही यादी असल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे. गांधी परिवारासहीत जोतिरादित्य सिंधिया, मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद, मोहम्मद अझरुद्दीन आणि नगमा अशा महाराष्ट्राबाहेरील नेत्यांचा या यादीत समावेश आहे. तर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांपैकी अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा आणि संजय निरुपम हे देखील स्टार प्रचारक म्हणून काम पाहणार आहेत.

राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक यादीतून विजयसिंह बाद

भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा कार्यक्रम राबवला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटील यांचीही अवस्था झाली आहे. विजयसिंह यांचे चिरंजिव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माढाची उमेदवारी मिळावी म्हणून भाजप प्रवेश केला. त्यानंतर विजयसिंह कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र विजयसिंह यांनी आपला फोन बंद करुन ठेवला असल्याचे खुद्द अजित पवार यांनीच सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीने आपल्या प्रचारापासून विजयसिंह यांना दूर ठेवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -