घरमहाराष्ट्रठग्स ऑफ महाराष्ट्र म्हणणाऱ्या विखेंना मिळाले मंत्रिपद

ठग्स ऑफ महाराष्ट्र म्हणणाऱ्या विखेंना मिळाले मंत्रिपद

Subscribe

युतीच्या सरकारवर टीका करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतल्याने या अधिवेशनात ते काय भूमिका मांडणार आणि विरोधकांना काय उत्तर देणार हे पाहणं तितकंच महत्वाचे ठरणार आहे.

हिवाळी अधिवेशनामध्ये ठग्स ऑफ महाराष्ट्र असे म्हणत युती सरकारवर टीका करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांना आज मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनटे मंत्रीपद मिळाले असून, त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली त्यामुळे एकेकाळी विरोधात असणारे विखें पाटील आता सत्तेत गेल्यानंतर काय बोलणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

विरोधीपक्ष नेते असताना काय म्हणाले होते विखे –

हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची भूमिका मांडणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांच्या सयुक्तिक पत्रकार परिषदे दरम्यान ठग्स ऑफ महाराष्ट्र असा फलक लावून त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो छापला होता. एवढच नाही तर या सरकारने कसे महाराष्ट्रातील जनतेला थकवले याचा जणू त्यांनी पाढाच वाचला होता. तर शिवसेना कशी सत्तेसाठी लाचार आहे हे त्यांनी आपल्या भाषणातून तसेच पत्रकार परिषदेत बोलून दाखवले होते. मात्र आता याच युतीच्या सरकारवर टीका करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतल्याने या अधिवेशनात ते काय भूमिका मांडणार आणि विरोधकांना काय उत्तर देणार हे पाहणं तितकंच महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

मंत्रीपद मिळताच विखे काय म्हणालेत –

दरम्यान मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारचे कौतुक केले असून, काँग्रेसमध्ये असताना मी कधी मंत्रिपदाची अपेक्षा केली नव्हती. मी नेहमीच विरोधीपक्ष नेता असताना आवाज उठवला. सरकारने चांगले निर्णय घेतले त्यामुळे महाराष्ट्राचा विकास झाला. उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे विरोधक जे जे सवाल करतील त्याचे तेवढ्याच ताकतीने उत्तर देऊ असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -