घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये राफेल, सुखोईचे प्रात्यक्षिक

पिंपरी-चिंचवडमध्ये राफेल, सुखोईचे प्रात्यक्षिक

Subscribe

पिंपरी चिंचवड मधल्या बच्चे कंपनी अनुभवता आले राफेल, सुखोई आणि उलटी तबकडी अशा अनेक रुपातली विमानांची प्रात्याक्षिक.

पिंपरी चिंचवड मधल्या बच्चे कंपनीला आज रविवारी असंख्य आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विमान आणि हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिक पाहायला मिळाली. पिंपरी चिंचवडमध्ये ‘एरो मोडेलिंग शो’चे प्रत्यक्षात सांगवीच्या पीडब्ल्यूडी मैदानात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड करांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर हे पाहून यावेळी बऱ्याच बच्चेकंपनीने विमान, कोणी हेलिकॉफ्टर बनविण्याचे तर कुणी पायलट बनण्याचे ध्येय मनात बाळगू लागले.

बच्चेकंपनीत उत्साहाचे वातावरण

राफेल, सुखोई, तेजस, ईगल, ग्लॅडर, उलटी तबकडी अशा अनेक रुपातली विमान पिंपरी चिंचवडच्या बच्चे कंपनींना अनुभवता आली. विमानांची ही प्रत्याक्षिक पाहून मुलांमध्ये एकच जल्लोष सुरु होता. विमान आणि हेलिकॉप्टर कसे टेक ऑफ आणि कसे लॅन्डिंग होते? हे प्रत्यक्षात अनुभवणं तसे कठीणचं. मात्र विज्ञानाने हे कसं घडवलं? हे लहान मुलांना सहजतेने उमगावं यासाठी या ‘एरोमॉडेलिंग शो’ चे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने हे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आता येणाऱ्या वार्षिक परीक्षांच्या तोंडावर पार पडलेलं हे एरोमॉडेलिंग शो चिमुकल्यांना रिफ्रेश करणार ठरले आहे.

- Advertisement -

हेेही वाचा – पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह थाटात संपन्न!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -