राफेलचे सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही – शरद पवार

शेतकर्‍यांचा प्रश्न जसा तातडीने सोडवणार असून, राफेलची देखील सखोल चौकशी करून यातील सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुलढाणा येथील जाहीर सभेत केले आहे.

Buldhana
Rafale truth will reveal soon- sharad pawar
राफेलचे सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही - शरद पवार

‘देशात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सरकार बहुमताने सत्तेवर आल्यावर शेतकर्‍यांचा प्रश्न जसा तातडीने सोडवणार असून, राफेलची देखील सखोल चौकशी करून यातील सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुलढाणा येथील जाहीर सभेत केले आहे.

मोदी सरकार घालवण्यासाठी सज्ज व्हा

‘आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार म्हणजे देणारच शिवाय उत्पन्नाच्या दिडपट हमीभाव देखील देणार आहोत. आम्ही नुसत्या घोषणा करत नाही. यापुर्वीही कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड नाही म्हणजे नाही’, असा शब्द पवार यांनी दिला आहे. तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मोदींची हुकुमशाही ते चौकीदार चोर है पर्यंतचे सर्व मुद्दे आपल्या भाषणात मांडत मोदींवर जोरदार हल्लाबोल्ल केला आहे. तसेच लोकशाहीची चौकट मोडू पाहणार्‍या मोदींवर टीकास्त्र सोडतानाच परिवर्तन करण्यासाठी आणि मोदी सरकार घालवण्यासाठी सज्ज व्हा’, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची आज जाहीर सभा बुलढाण्यात पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार जोगेंद्र कवाडे, खासदार माजिद मेमन, उमेदवार आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र तुपकर, कॉंग्रेसचे नेते मुकुल वासनिक,रमेश बंग, रेखाताई खेडेकर, साहेबराव सत्तार आदी उपस्थित होते.


वाचा – लुंग्यासुंग्याने टीका केली तर मी लक्ष देत नाही; शरद पवारांचा मोदींवर घणाघात


मला फक्त ५ वर्षे संधी द्या

‘मी तुमच्यातील माणूस आहे हे लक्षात घ्या. दहा वर्ष त्या खासदाराला संधी दिलात मला फक्त ५ वर्षे संधी द्या तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही’, असे आश्वासन उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहे.


वाचा – मोदींना कुटुंब माहीत नाही, म्हणून ते इतरांच्या कुटुंबावर टीका करतात – शरद पवार


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here