घरमहाराष्ट्र१ मार्च रोजी मुंबईत राहुल गांधींची सभा

१ मार्च रोजी मुंबईत राहुल गांधींची सभा

Subscribe

बेरोजगारांना देणार विशेष भत्ता, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुमप यांची घोषणा

भाजप सरकार आल्यापासून गेली साडे चार वर्षात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली. दर महिन्याला सुमारे १० लाख नवीन तरुण बेरोजगार होत आहेत. दरवर्षी सुमारे १ करोड ५० लाख तरुण बेरोजगार होत आहेत. भाजप सरकारच्या नोटा बंदी आणि जीएसटी सारख्या निर्णयामुळे संपूर्ण देशात बेरोजगारी वाढलेली आहे. म्हणुनच आमचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून काँग्रेसतर्फे चलो वार्ड अभियान – तरुण बेरोजगारांना नोकरी आणि बेरोजगारी भत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी मुंबईत केली. तर येत्या १ मार्च रोजी मुंबईत राहुल गांधीची सभा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी वरील घोषणा केली. यावेळी खासदार हुसेन दलवाई, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव, उपाध्यक्ष सुरज ठाकुर उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी बोलताना संजय निरुपम म्हणाले की, राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये हे अभियान सुरु केलेले आहे. राजस्थानमध्ये आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. रुपये ३५०० बेरोजगारी भत्ता तेथील तरुणांना १ मार्च पासून मिळणार आहे. महाराष्ट्रात आमची सत्ता आल्यावर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार मिळून आम्ही तरुणांना नोकरी आणि बेरोजगारी भत्ता देणार आहोत. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गाधी येत्या १ मार्च २०१९ रोजी महाराष्ट्र दौर्यावर येणार आहेत. राहुल गांधी यांची मुंबई आणि धुळे येथे जाहिर सभा होणार आहे. तर या अभियाना अंतर्गत तरुणांनी ७३०३५०२०१९ बेरोजगार तरुणांनी मिस्ड कॉल द्यायचा आहे. आपल्या उज्वल भविष्यासाठी तरुणांनी या अभियानात सहभागी व्हा असे आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आलेले आहे. तसेच मुंबई काँग्रेस व युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जाऊन या अभियानाची माहिती देण्यात येणार आहे. मुंबईतून ६.५ लाख नोंदणी करण्याचे लक्ष्य आहे, असे निरुपम यांनी यावेळी सांगितले.

अभिनेत्री आसावरी जोशींचा काँग्रेसमध्ये प्रवेश
बिग बॉस फेम शिल्पा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सोमवारी अभिनेत्री आसावरी जोशी यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आसावरी जोशी म्हणाल्या की माझ्यासाठी हे क्षेत्र नवीन आहे. मी समाजसेवेसाठी राजकारणात आलेली आहे. काँग्रेस हा सर्वधर्म समभाव असणारा पक्ष आहे, एक वैचारिक व सुरक्षित पार्टी आहे. काँग्रेस पक्षाने संधी दिली तर लोकसभा लढविण्यासाठी मी उत्सुक आहे, परंतु संपूर्ण निर्णय हा काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचा असेल, ते जी जबाबदारी मला देतील ती मी स्वीकारायला तयार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -