घरताज्या घडामोडीकोकणातील चाकरमान्यांसाठी 'मनसेचे इंजिन'

कोकणातील चाकरमान्यांसाठी ‘मनसेचे इंजिन’

Subscribe

कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाकडून किमान मुंबईचा परतीचा प्रवास तरी कोकण रेल्वेने व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी आता रेल्वे प्रवासी संघ मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडयांसाठी सतत पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारने कोकणात ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. मध्य रेल्वेने २०८ फेर्‍या चालविण्याचा प्रस्ताव सुद्धा अंतिम मंजूरीसाठी रेल्वे बॉर्डाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, पुढे याला नकार दिल्याने कोकणातील चाकरमान्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. तसेच चाकरमानी सुद्धा चांगलचे संभ्रमात पडले आहे. तसेच आता कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाकडून किमान मुंबईचा परतीचा प्रवास तरी कोकण रेल्वेने व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी आता रेल्वे प्रवासी संघ मनसेप्रमुख राज ठाकरे यांची १५ ऑगस्ट रोजी भेट घेऊन आपल्या समस्या माडणार आहेत.

कोकण रेल्वे सुरु करण्यासाठी चाकरमानी जाणार कृष्णकुंजवर

कोकणातील सर्व प्रवासी संघटना मागील दोन महिन्यांपासून गणेशउत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी राज्यसरकारकडे एसटी बस आणि कोकण रेल्वेची मागणी करीत आहेत. मात्र, राज्यसरकारने एका बाजूला १४ दिवसांचे होम क्वारंटाईनची भिती दाखवली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या चाकरमान्यांनी दुसर्‍यांकडून उसने पैसे घेऊन नेहमीच्या प्रवास भाडयाच्या ५ पट भाडे देऊन कोकणात आपल्या गावी गेले आहेत. आतापर्यंत ८०% चाकरमानी गावी पोहोचल्यानंतर राज्यसरकारने एसटी बसेस आणि कोकण रेल्वेची घोषणा केली. त्यातील बस देखील सुरू झाल्या आहेत. मात्र, कोकण रेल्वेचे काय? मार्चमध्ये होळीच्या दरम्याने लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आजपर्यंत कोकणात साधारण ५ लाख चाकरमानी गेलेले आहेत. मात्र, हे सर्वजण गणपती विसर्जनानंतर परत मुंबईत येणार आहेत. कोकण रेल्वे सुरू केल्यास कमीत कमी खर्चामध्ये सोशल डिसस्टींग पाळून लोकांना मोठया संख्येने परत मुंबईत येता येईल. मात्र, तसे न झाल्यास चाकरमान्यांची आर्थिक लुटमार होण्याची शक्यता आहे. परत येणार्‍या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, म्हणूण मुंबईचा परतीचा प्रवास तरी कोकण रेल्वेने व्हावा, अशी मागणी करत आहे. या मागणी संबंधीत कोकण रेल्वे समन्वय समितीकडून विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. तर ठाण्यातील कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ मनसेप्रमुख राज ठाकरे यांची १५ ऑगस्ट रोजी भेट घेऊन आपल्या समस्या मांडणार आहेत.

- Advertisement -

राज्यातील भूमिपुत्र वार्‍यावर

लॉकडाऊनच्या काळात राज्यसरकारने उत्तरभारतीयांना रेल्वेने मोफत त्यांच्या गावी सोडले. मात्र, राज्यातील भूमिपुत्रांसाठी सरकार काहीच करू शकत नाही. कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. तो सरकारकडे हात पसरणारा नाही. त्यासाठीच कोकण रेल्वे मार्गावर आरक्षित रेल्वे सुरू कराव्यात अशी मागणी केली आहे. मात्र, आतापर्यंत या मागणीकडून सतत दुर्लक्ष करत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार नियमांवर बोट ठेवून कसलाही निर्णय घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोकणातील चाकरमानी सरकारच्या धोरणाविरोधात नाराज आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरेकडे मांडणार समस्या

कोकणातून परत येणार्‍या चाकरमांन्यासाठी रेल्वे गाडया सुरु व्हाव्यात. मात्र, तसे न झाल्यास चाकरमान्यांची भयंकर आर्थिक लुटमार होण्याची शक्यता आहे. आगोदरच कोरोनाच्या संकटात आर्थिक चणचणीमुळे सर्वांचे कंबरडे मोडून गेले आहे. तर सरकारकडे केलेल्या प्रत्येक मागण्यांना केराची टोपली दाखवली गेली आहे. त्यामुळे आता आम्ही मनसेप्रमुख राज ठाकरे यांची १५ ऑगस्ट रोजी भेट घेणार असून आम्ही आमच्या समस्या मांडणार आहोत. -राजू कांबळे, प्रमुख, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणे

- Advertisement -

हेही वाचा – कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या मार्गात अधिक विघ्ने


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -