घरताज्या घडामोडीपावसाचा जोर ओरसला, पण सोलापूर, पंढरपुरात पूरस्थिती अद्याप कायम

पावसाचा जोर ओरसला, पण सोलापूर, पंढरपुरात पूरस्थिती अद्याप कायम

Subscribe

मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसानं धुमशान घातलं आहे. पण सोलापूर आणि पंढपुरातल्या पावसाचा जोर काल दुपारपासून काहीसा ओसरला आहे. पण अद्याप पूरस्थिती कायम आहे. २००७ नंतर पहिल्यांदाच चंद्रभागेला मोठा पूर आला आहे. दरम्यान नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचले आहे, रस्त्ते पाण्याखाली गेले आहेत आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. चंद्रभागा नदीचे पाणी पंढरपूर शहरात शिरलं असून चंद्रभागेतील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पंढपुरात येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे १७ हजार नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

उजनी धरणातून विसर्ग कमी असला तरी सुद्धा मागच्या ४८ तासात पावसाचे पाणी ओढे, नाल्यात गेल्याने आणि चंद्रभागेत मिसळत असल्यामुळे चंद्रभागेची पाणी पातळी तेवढीच आहे. त्यामुळे सध्या पंढपुरात होड्या चालवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अजूनही पंढपुरात शहरातील रस्त्त्यांना नद्याच्या स्वरुप कायम आहे.

- Advertisement -

दरम्यान सोलापूरच्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. सध्या उजनीतून भीमा नदीपात्रात १ लाख २० हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. अजूनही बार्शी, उत्तर-दक्षिण सोलापुरात अनेक नागरिक अडकले आहेत. प्रदक्षिणा मार्गावरील सर्व संतांच्या मठामध्ये पाणी शिरलं आहे.
एनडीआरएफ, स्थानिकांच्या मदतीने नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत असून जिल्ह्यातील ५०० हून अधिक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.


हेही वाचा – कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -