करोनानंतर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची चिंता!

Mumbai
monsoon comes in maharashtra
पाऊस पुन्हा येणार

बुधवारी गुढीपाडव्याच्या दिवशी पुणे, नागपूर अशा अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. येत्या ३० मार्चपर्यंत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणेमध्ये रविवारी २९ मार्चला गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदूर्गमध्ये २९ आणि ३० मार्चला पावसाची शक्यता हवामानखात्याने वर्तवली आहे.

येत्या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. २९ आणि ३० मार्च या दोन दिवशी याची तीव्रता अधिक वाढेल असा अंदाज  प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. शनिवारनंतर हवेच्या खालच्या थरात ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. यासोबतच हवेतील बाष्पामुळे महाराष्ट्रात रविवारी आणि सोमवारी पावसाचा जोर आणि गडगडाट याची तीव्रता वाढू शकते, असे भारतीय हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक येथे आज, शुक्रवारीही पावसाची शक्यता आहे. शनिवारी पाऊस नसेल. मात्र पुन्हा रविवार, सोमवार दोन्ही दिवस पाऊस पडेल. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड येथे सातत्याने पावसाची शक्यता आहे. तर सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथे शनिवारपासून सलग तीन दिवस पावसाचे पूर्वानुमान वर्तवण्यात आले आहे.


हे ही वाचा – नितीन गडकरींना महाराष्ट्राची ‘वजनदार’ जबाबदारी


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here