घरमहाराष्ट्रपुण्यात पावसाचा कहर; काळजात धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल

पुण्यात पावसाचा कहर; काळजात धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल

Subscribe

पुण्यात परतीच्या पावसाने कहर केला असून शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. राज्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत होता. आता पावसाचा जोर ओसरला असला तरी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

पुण्यात मुळसधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुण्यातील या परिस्थितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये शहरात पूर आल्यासारखं पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. अनेक गाड्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. पुण्याच्या हिंगणेखुर्द परिसरातील हा व्हिडीओ आहे. संपूर्ण रस्त्यांना नदीचं स्वरुप आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आज हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, सिंहगड रस्ता परिसरात वाहने वाहून गेली. चंदननगर पोलीस स्टेशनमध्येही पाणी शिरलं. दांडेकर पुलालगत सर्व्हे नंबर १३३ मधील काही नागरिकांना साने गुरुजी शाळा आणि मनपा कॉलनी शाळा या दोन्ही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. या भागातून जाण्याचं टाळावं अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – Pune Heavy Rains: पुरात ४ जण वाहून गेले, तिघांचा मृतदेह सापडला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -