घरताज्या घडामोडीराज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार!

राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार!

Subscribe

राज ठाकरेंनी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची स्वत: जाऊन भेट घेणार आहे, असं अधिवेशनावेळी केलेल्या भाषणात जाहीर केलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बदललेल्या भूमिकेवर बरीच चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात घडत होती. त्यातही मनसेने झेंड्याचा बदललेला भगवा रंग विशेष चर्चेत राहिला आहे. त्यामुळेच आजच्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे नक्की काय भूमिका मांडणार? याची उत्सुकता सगळ्यांमध्ये होती. अखेर, राज ठाकरेंनी अधिवेशनामध्ये मनसेची भूमिका जाहीर केली आहे. ‘जिथे माझ्या मराठीला नख लागेल, तिथे मराठी म्हणून मी अंगावर जाईन आणि जिथे माझ्या धर्माला नख लागेल, तिथे मी हिंदू म्हणून अंगावर जाईन’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. मात्र, असं म्हणत असताना त्यांनी यावेळी एक महत्त्वपूर्ण घोषणा देखील केली. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मी स्वत: जाऊन भेटणार आहे’, असं राज ठाकरे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

यावेळी पाकिस्तान आणि बांगलादेशातून घुसखोरी करणाऱ्यांविरोधात राज ठाकरेंनी परखड शब्दांत टीका केली. ‘बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमान या देशातून गेलेच पाहिजेत. त्यासाठी केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आहे. राज्यात असे काही भाग आहेत, या भागांमध्ये अनेक बाहेरच्या देशांमधले मौलवी जातात. आतमध्ये पोलिसांना देखील जाता येत नाही. त्या भागात काय शिजतंय ते कळत नाही. पोलिसांचं असं म्हणणं आहे की हा मोठं कारस्थान घडवण्याचा डाव शिजतोय. जर ही माहिती पोलिसांकडे असेल, तर त्यांना मोकळे हात देणं गरजेचं आहे. त्यासाठी मी स्वत: देशाचे गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार आहे’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, मुंबई पोलिसांना फक्त ४८ तास मोकळे द्या, बघा काय करून दाखवतात’, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

- Advertisement -

दरम्यान, येत्या ९ फेब्रुवारी आझाद मैदानावर मनसे मोर्चा काढणार आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशी मुसलमानांना परत पाठवा, या मागणीसाठी हा मोर्चा असेल.


वाचा राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण, इथे क्लिक करा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -