घरताज्या घडामोडीराज ठाकरेंच्या भाषणात शिवसेनेवर हिंदुत्वावरून बोचरी टीका!

राज ठाकरेंच्या भाषणात शिवसेनेवर हिंदुत्वावरून बोचरी टीका!

Subscribe

राज ठाकरेंनी महाअधिवेशनात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंमध्ये असलेलं राजकीय वैर अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पक्ष स्थापनेनंतर १४ वर्षांनी घेतलेल्या पहिल्याच अधिवेशनात राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर बोलतानाच त्यांचे बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री, तसेच शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून खोचक टीका केली आहे. झेंड्याचा रंग भगवा केल्यामुळे राज ठाकरेंनी त्यांची मूळ मराठीची भूमिका बदलून व्यापक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्याचं बोललं जात होतं. मात्र, त्याचा राज ठाकरेंनी समाचार घेतला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

‘झेंड्याचा रंग बदलला म्हणून चर्चा सुरू झाली राज ठाकरे बदला म्हणून. पण मी आजही तसाच आहे. राज ठाकरेचा रंग आजही तोच आहे. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो’, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. याआधीच सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘काही लोकांना आता हिंदुत्वाचे उमाळे फुटू लागले आहेत. फुटू देत. पण आम्हीच खरे आहोत’, असं म्हणत राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. त्यामुळे शिवसेनेवर राज ठाकरे काहीतरी टिप्पणी करणार, हे अपेक्षितच धरलं जात होतं.

- Advertisement -

इथे वाचा राज ठाकरेंचं महाअधिवेशनातलं सविस्तर भाषण!

दरम्यान, फक्त हिंदुत्व आणि बदललेला झेंडा याच मुद्द्यांवर राज ठाकरेंनी यावेळी भूमिका मांडली. इतर सगळ्या मुद्द्यांवर येत्या २५ फेब्रुवारीला होणाऱ्या सभेमध्ये सविस्तर बोलेन असं त्यांनी यावेळी जाहीर केलं. तसेच. येत्या ९ फेब्रुवारीला मनसेच्या वतीने पाकिस्तानी आणि बांगलादेशी घसखोरांना हाकलण्याची मागणी करण्यासाठी मोर्चा काढला जाईल, असं देखील राज ठाकरेंनी यावेळी जाहीर केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -