‘राग आणीबाणी’…राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून वर्तवले भाकीत

व्यंगचित्राच्या एका बाजूला 'हुद्दा घालवला आणि खड्डा कमावला' अशी मार्मिक टीका राज यांनी केली आहे. तर चित्राच्या दुसऱ्या भागात 'राग आणीबाणी... (उद्या हेही घडेल)' असं म्हणत भाकीत वर्तवलं आहे.

Mumbai
सौजन्य- सोशल मीडिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच व्यंगचित्रांच्या माध्यमातून राजकीय नेत्यांवर आणि सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधत असतात. पुन्हा एकदा राज यांनी लोक वर्मा प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राज यांनी त्यांच्या एकाच व्यंगचित्रातून पंतप्रधान मोदी आणि वर्मा यांना एकाचवेळी टार्गेट केलं आहे. अघोषित आणीबाणी आणि अलोक वर्मा प्रकरणावरून राज ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन दिवसांपूर्वीच निवड समितीने अलोक वर्मा यांची सीबीआयच्या संचालक पदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांची बदलीही केली गेली. मात्र, वर्मा यांनी तो प्रभाग स्विकारण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. याच मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी मोदी सरकारला व्यंगचित्रातून जोरदार टोला हाणला आहे. व्यंगचित्राच्या एका बाजूला त्यांनी ‘हुद्दा घालवला आणि खड्डा कमावला’ अशी मार्मिक टीका केली आहे. तर चित्राच्या दुसऱ्या भागात ‘राग आणीबाणी… (उद्या हेही घडेल)’ असं म्हणत भाकीत वर्तवलं आहे.


व्यंगचित्राच्या डावीकडील भागात पंतप्रधान मोदी खड्डा खणताना दाखवले आहेत. त्या भागाला राज यांनी ‘संशय’ असे शीर्षक दिले आहे. तर खड्याच्या बाजूला अलोक वर्मा प्रकरण एका मृतदेहाप्रमाणे दाखवले आहे. मोदी वर्मा प्रकरण खड्यात गाडून संपवून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. तर उजवीकडील भागात नयनतारा सहगलांच्या प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे. एक गायिका तंबोरा घेऊन गायला बसली आहे. त्या गायिकेसमोरचा हार्मोनियम वादक त्यांना विचारत आहेत की पोलीस तुम्हाला विचारतयात… आज कोणता राग गाणार आहात? दरम्यान, राज यांच्या या व्यंगचित्रावर आता कुणी प्रतिउत्तर देणार का? हे येणारी वेळच सांगेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here