घरमहाराष्ट्र'या नालायक माणसांसाठी जीवाची बाजी लावू नका'; राज ठाकरेंची अण्णांना सूचना

‘या नालायक माणसांसाठी जीवाची बाजी लावू नका’; राज ठाकरेंची अण्णांना सूचना

Subscribe

लोकपाल बिलाच्या नियुक्तीसाठी उपोषणाला बसलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेतली.

लोकपाल बिलाच्या नियुक्तीसाठी उपोषणाला बसलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी मोदी आणि फडणवीस सरकारवर आगपाखड करत, या नालायक आणि ढोंगी माणसांसाठी तुम्ही जीवाची बाजी लावू नका, अशी सूचना आपण अण्णांना केल्याचे राज ठाकरे यांनी या भेटीनंतर बोलताना सांगितले. लोकपाल नियुक्तीसाठी सुरु असलेल्या अण्णांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून दरम्यान त्यांच्या या भूमिकेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील पाठिंबा दर्शवला होता. अण्णांच्या जीवाशी खेळू नका, असे बोल उद्धव यांनी सरकारला लावले होते. तर आज, सोमवारी राज ठाकरे यांनी स्वतः राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेतली.

वाचा – सत्ता मिळवण्यासाठी भाजपने माझा वापर केला – अण्णा हजारे

- Advertisement -

काय म्हणाले राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मोदींवर अजिबात विश्वास ठेऊ नका, असं आपण अण्णांना सांगितल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले. मोदींनी ५ वर्षांपूर्वी लोकपाल बिल पास व्हावं, असं ट्वीट केल होत. परंतू अजूनही ते बिल पास झालेलं नाही. अण्णांच्या आंदोलनामुळेच हे सरकार आज सत्तेवर आलं आहे. याची आठवण राज ठाकरे यांनी यावेळी करून दिली. तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज इथे (राळेगणसिद्धी) यायला हवे होते. अण्णांना साथ द्यायला हवी होती, असेही राज यांनी म्हटले.

anna
अण्णा

हे निर्लज्ज सरकार

मोदी आणि केजरीवाल यांनी अण्णांना वापरून घेतलं आहे. अण्णांमुळे मोठे झालेले केजरीवाल साधं भेटालया, तब्येतीची विचारपूस करायलाही येत नाहीत. मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान बघितला नाही. माणसं वापरून फेकून देणं, एवढंच त्यांना माहिती आहे. पाच वर्ष झाली तरी अद्याप लोकपालाबाबत कारवाई झालेली नाही. त्यामुळे अण्णांना सांगितलं की, या ढोंगी माणसांसाठी जीवाची बाजी लावू नका. आपण एकत्र येऊन या सरकारला गाडू. हे अण्णांना सांगितल्याचे राज ठाकरे यांनी राळेगणसिद्धीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. अण्णांनी तात्काळ हे उपोषण सोडावं आणि या सरकारला गाडता कसं येईल, हे पहावं, असही म्हटलं आहे.

- Advertisement -

वाचा – अण्णा हजारेंच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात

राज ठाकरेंच्या परिषदेचे महत्त्वाचे मुद्दे :- 

  • २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदी-शाह विरुद्ध इतर विरोधी पक्ष असा लढा नसून मोदी-शाह विरुद्द देशातील जनता असा लढा होईल किंवा मोदी-शाह विरुद्ध भारतीय जनता आणि भारतीय जनता पक्ष असा पण लढा होऊ शकतो.
  • एखाद्या गडावरचा गडकरी पण महत्वाचा असतो, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार (संदर्भ :- गेले काही दिवस नितीन गडकरींच्या विधानांचा सूर हा मोदी-शाह पद्धतीच्या राजकारणा विरोधातला जाणवतोय, त्यावर प्रश्न विचारल्यावर मा. राज ठाकरेंनी दिलेले उत्तर)
  • शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात दर महिना ५०० रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा ह्यांनी केली आहे, ह्या महिना ५०० रुपयांनी शेतकऱ्याचं आयुष्य सुधारणार आहे का?
  • सीबीआय असो अथवा रिझर्व्ह बँक असो ह्या सारख्या स्वायत्त संस्थांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींचा सुरु आहे. काल पश्चिम बंगाल मध्ये चौकशीच्या नावाखाली राज्य सरकारला विश्वासात न घेता कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांच्या घरावर सीबीआयने धाड टाकली. हा काय प्रकार आहे? राज्य सरकारला का विश्वासात घेतलं गेलं नाही? स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी नरेंद्र मोदी हे स्वायत्त संस्थांचा वापर करत आहेत. आज सीबीआय विरुद्ध पोलीस असा संघर्ष पेटला आहे, जो अतिशय घातक आहे. सीबीआयच्या प्रमुखाला एका रात्रीत तडकाफडकी काढून टाकणं, सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीनी पत्रकार परिषद घेणे, रिझर्व्ह बँकेच्या २ गव्हर्नरनी राजीनामा देणं हे योग्य आहे का?
  • २०१४ ला अफाट थापा मारून भाजप सत्तेत आले हे आज सगळ्यांच्या लक्षात आलं आहे.
  • अण्णा हजारेंना पंतप्रधान कार्यालय शुभेच्छा देतं ,त्यांच्या मागण्यांवर कारवाई करायची सोडून हा असला पोरकट प्रकार करता तुम्ही. हे लोकं नालायक आणि निलाजरे आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -