चौकीदाराच्या भानगडीत पडू नका – राज ठाकरे

चौकीदाराच्या भानगडीत पडू नका. भाजपची चौकीदाराची कॅम्पेन फार्स आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

Mumbai
raj thackeray
उत्तर मुंबई मतदारसंघात राज ठाकरेंच्या सभेची शक्यता

मनसेचा मुंबईतील रंगशारदा येथे कार्यकर्ता मेळावा सुरु होता. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. राज ठाकरे यांनी देशातील जनतेला मोदींना मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे म्हणाले की, आगामी निवडणूक ही मोदी आणि अमित शहा यांच्याविरुद्ध संपूर्ण देश अशी निवडणूक आहे. मोदीमुक्त भारत व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. यामुळे मी यापुढे ज्या सभा घेईल त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात असेल. यापुढे त्यांनी चौकीदार या विषयावर टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, ‘भारताची निवडणूक आहे की नेपाळची? पंतप्रधानाचे विचार देशाला मोठे करण्याचे हवेत. या चौकिदाराच्या भानगडीत पडू नका. या कॅम्पेनकडे लक्ष देऊ नका. भाजपचा हा फार्स आहे.’

‘पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना वाटेल ती उत्तरे का देतात?’

गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होणार, अशी चर्चा सुरु होती. याच चर्चेवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कधीही जागांची मागणी केली नव्हती.’ दरम्यान, अजित पवार माध्यमांसमोर बोलताना मनसे सोबत हवी, असे म्हणाले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी अजित पवार यांना फोन केला आणि अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भात राज ठाकरे म्हणाले की, ‘मी त्यांना फोन केला. त्यांना विचारलं तुमच्याकडे जागा मागितल्या का? आमच्यापैकी कोणी तुमच्याशी बोललय का? त्यांच उत्तर नाही होतं. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही फोन आला. त्यावेळी त्यांनाही तुमच्याकडे जागा मागितल्या का? असा प्रश्न विचारला. त्यांनीसुद्धा नाही, असेच उत्तर दिले. मग पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना वाटेल ती उत्तरे कशी देतात?’

आघाडीसोबत जाणार का?

आघाडी संदर्भात राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण कोणाहीसोबत नसून फक्त मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात आहोत, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. मोदींना विरोध करणारच आणि त्यासाठी आपण सभा घेणार आहोत, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे निवडणूक लढवणार नसली तरी मोदींच्या विरोधात सभा घेणार, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांवर केली टीका

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस म्हटले होते की, ‘राज ठाकरे हे बोलके पोपट आहेत. त्यांचे स्क्रिप बारामतीतून येतात.’ त्यांच्या याच वक्तव्यावरुन राज ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘कपडे आम्ही त्यांचे काढले आणि त्यांना आमचा पोपट दिसला.’ यापुढे राज ठाकरे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री देवेंदेर फडणवीस हे म्हणजे हवा गेलेला फुगा आहे. फुगलेल्या फुग्याला जसा कोणताही आकार दिला जातो तशी अवस्था देवेंद्र फडणवीस यांची आहे.’

नरेंद्र मोदींच्या भाषणाचे दाखवले व्हिडिओ

दरम्यान, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे काही व्हिडिओ क्लीप भाषणादरम्यान दाखवले. या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी शरद पवार यांची स्तुती करत होते. यातून आपण शरद पवार यांची उगाच टीका करत नाही. ती व्यक्ती तशीच आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. कधी एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पवारांची स्तुती केली असल्याचे राज ठाकरे म्हणाले. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींचे काही व्हिडिओ दाखवले. त्यात नरेंद्र मोदी शरद पवार यांची स्तुती करत आहेत. यानंतर ठाकरे म्हणाले की, ‘चौकीदार वगैरे हे सगळे नवीन गिमिक्स आहेत. तुम्हाला त्यात अडकवणार. काय केलं साडे चार वर्षात?’

 

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here