घरमहाराष्ट्रमोदींनी ५ सेकंदात ७ संडास कशी बांधली? - राज ठाकरे

मोदींनी ५ सेकंदात ७ संडास कशी बांधली? – राज ठाकरे

Subscribe

२०१४च्या निवडणुकांआधी मोदींन्या घेतलेल्या चाय पे चर्चा शोमध्ये त्यांनी लोकांना दिलेल्या आश्वासनांची व्हिडिओ क्लिप देखील दाखवली. या क्लिपमध्ये मोदी परदेशातला काळा पैसा भारतात आणून करदात्यांना त्यातला ५ टक्के निधी गिफ्ट म्हणून देणार असल्याचं आश्वासन देत असल्याचं दिसत आहे. मात्र, त्या आश्वसनाचं काय झालं? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.

सोलापूरपाठोपाठ इचलकरंजीमध्ये देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजप आणि मोदी-शाह यांच्याविरोधातली आपली तोफ धडाडत ठेवली आहे. मनसे निवडणूक लढवत नसताना राज ठाकरे प्रचार करत असल्याच्या भाजपच्या टीकेला राज ठाकरेंनी सुरुवातीलाच उत्तर दिलं. ‘मी निवडणूक लढवत नसलो, तरी मोदी-शाह नावाचं संकट दूर करण्यासाठी प्रचार सभा घेत आहे’, असं राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. तसेच, मोदींनी ‘बिहारमध्ये आठवड्याभरात ८ लाख ५० हजार संडास बांधले’, अशा केलेल्या दाव्याचा समाचार राज ठाकरेंनी यावेळी घेतला. या हिशोबाने एका मिनिटाला ८४ संडास म्हणजेच ५ सेकंदात ७ संडास यांनी कशी बांधली? हे कसं शक्य आहे’? असं ते म्हणाले.

२०१४च्या निवडणुकांआधी मोदींन्या घेतलेल्या चाय पे चर्चा शोमध्ये त्यांनी लोकांना दिलेल्या आश्वासनांची व्हिडिओ क्लिप देखील दाखवली. या क्लिपमध्ये मोदी परदेशातला काळा पैसा भारतात आणून करदात्यांना त्यातला ५ टक्के निधी गिफ्ट म्हणून देणार असल्याचं आश्वासन देत असल्याचं दिसत आहे. मात्र, त्या आश्वसनाचं काय झालं? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. तसेच, बिहारमध्ये आठवड्याभरात ८ लाख ५० हजार संडास बांधल्याच्या मोदींच्या दाव्याचा देखील यावेळी राज ठाकरेंनी समाचार घेतला. ‘मोदींच्या हिशोबानं जायचं म्हटलं तर एका मिनिटाला ८४ संडास म्हणजेच ५ सेकंदाला ७ संडास बांधून झाली असं गणित येतं. एवढ्या वेळात होतही नाही’, असा टोमणा देखील राज ठाकरेंनी मारला.

- Advertisement -

‘इम्रान खानसोबत मोदींची अॅडजस्टमेंट’

पाकिस्तानमधले पंतप्रधान इम्रान खान जर सांगतायत की मोदी पंतप्रधान हवेत, तर ते तसं का म्हणाले? ही अॅडजस्टमेंट नाही का? असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी केला. देशातले जवान शहीद होत असताना मोदी मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना केक भरवतात? हे पाहून शहीदांच्या कुटुंबियांना काय वाटत असेल? असाही प्रश्न राज ठाकरेंनी यावेळी विचारला.

‘मी निवडणूक न लढवताही भाजपवाले फडफडतायत’

दरम्यान, यावेळा राज ठाकरेंनी निवडणून लढवत नसल्याच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला. ‘मी निवडणूक लढवत नसतानाही भाजपवाले फडफडतायत. निवडणूक आयोगाकडे तक्रार करतायत. म्हणे खर्च मोजायचा कसा? आम्ही सभा घेतोय, तर खर्चही आमच्याच खात्यात मोजायचा ना!’, असं ते म्हणाले. ‘राज ठाकरे जे प्रश्न विचारतोय, त्यांची उत्तरं कशी द्यायची, हे त्यांना कळत नाहीये. त्यांनी याची कधी अपेक्षाच ठेवली नव्हती. यामुळे एक होईल, देशातला कोणताही राजकारणी तुमच्यासमोर उभा राहील, तेव्हा तो खोटं बोलणार नाही. तो जर बोलला, तर ५ वर्षांनंतर अशाच क्लिप दिसणार’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

लोया हत्या प्रकरणाचा केला उल्लेख

यावेळी जस्टीस लोया यांच्या कथित हत्या प्रकरणाचा देखील राज ठाकरेंनी उल्लेख केला. ‘सर्वोच्च न्यायालयाचे ४ न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन सांगतात की लोकशाही धोक्यात आहे. स्वातंत्र्यापासून असं कधीच झालं नव्हतं. जस्टीस लोयांचा खून झाल्यानंतर संशयाचं बोट अमित शाह यांच्याकडे जात होतं. सुप्रीम कोर्टात जेव्हा याची सुनावणी सुरू होती, तेव्हा त्यांच्यावर दडपण यायला लागलं आणि त्या ४ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. याचं उत्तर भाजपनं द्यावं’, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

‘मोदींना झटका आला आणि नोटबंदी केली’

‘आरबीआयचे २ गव्हर्नर सरकारच्या दबावामुळे राजीनामे देतात. हेही आजपर्यंत देशाच्या इतिहासात घडलं नव्हतं. पंतप्रधानांना झटका आला आणि त्यांनी नोटबंदी केली. आरबीआयच्या गव्हर्नरला माहिती नाही, मंत्रिमंडळाला खोलीत कोंडून मोबाईल काढून घेतले आणि बाहेर येऊन घोषणा केली. असं काय घडलं होतं? सगळ्या यंत्रणा तुमच्या हातात असताना तुम्हाला माहीत नाही, की काळा पैसा कुठे आहे? भाजपनंही निवडणुकीला आलेला पैसा आला कुठून? याचं उत्तर भाजपनं द्यावं. ८०० कोटींच्या खोट्या नोटांसाठी तुम्ही १६ लाख कोटींच्या नोटा बंद करून टाकल्या?’ असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच ‘नमामी गंगेसाठी २० हजार कोटी काढले होते. ते कुठे गेले? जाहीर केलेल्या योजनांच्या फक्त जाहिराती करण्यासाठी साडेचार हजार कोटी खर्च केले. जेट एअरवेज कुणामुळे डबघाईला आली?’ असाही प्रश्न त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -