घरमहाराष्ट्रमोदींच्या दत्तक गावाची काय तऱ्हा; रायगडमध्ये राज ठाकरेंनी दाखवला ग्राऊंड रिपोर्ट!

मोदींच्या दत्तक गावाची काय तऱ्हा; रायगडमध्ये राज ठाकरेंनी दाखवला ग्राऊंड रिपोर्ट!

Subscribe

प्रत्यक्ष निवडणूक न लढवताही राज ठाकरे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये चांगलंच रान उठवत आहेत. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला राज ठाकरेंच्या सभांमुळे दिलासा मिळाला असताना दुसरीकडे भाजप-शिवसेना युतीला मात्र चांगलाच धक्का बसत आहे. शुक्रवारी संध्याकाळी रायगडमध्ये झालेल्या सभेमध्ये देखील राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली.

मोदींच्या दत्तक गावाचं काय झालं?

मोदींनी निवडून आल्यानंतर प्रत्येक खासदारानं एक गाव दत्तक घ्यायचं अशी घोषणा केली होती. यावेळी मोदींनी स्वत: दत्तक घेतलेल्या वाराणसीतल्या नागेपूर गावातला व्हिडिओ राज ठाकरेंनी दाखवला. या व्हिडिओमध्ये त्या गावातली माणसं गावातल्या समस्यांचा पाढा वाचताना दिसत असून मोदींनी आश्वासन दिलेल्या मुद्द्यांपैकी एकाही मुद्द्यावर काम झालं नसल्याचं गावकरी व्हिडिओमध्ये सांगत आहेत. दरम्यान, यावेळी मोदींनी देशातलं पहिलं कॅशलेस गाव ठरलेल्या धसईमधला एक वृत्तवाहिनीचा वृत्तांत दाखवला. यामध्ये कॅशलेस म्हणून गवगवा झालेल्या कॅशलेस गावात अशी कोणतीही पद्धत अस्तित्वात नसल्याचं या वृत्तामध्ये सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

आत्ता काही पक्ष जागे होऊन व्हिडिओ वगैरे दाखवतायत. पण हे आत्ता करायला लागलेत. आम्ही ६ महिन्यांपासून हे सगळं गोळा करतोय. हे काय आत्ताचं काम आहे का? हे असे व्हिडिओ दाखवल्यामुळे याच्यापुढे हे असे राजकारणी तुम्हाला खोटी स्वप्न दाखवणार नाहीत. दाखवली, तर ५ वर्षांनी इथे व्हिडिओ असतीलच! मोदींना वाटलं ५ वर्षांपूर्वी आम्ही बोलून गेलो, आता कोण लक्षात ठेवतोय? पण आम्ही आहोत ना!

अटलजींनी कारगिलचा कधी बाजार नाही मांडला

नरेंद्र मोदी पुलवाम्याच्या नावाने मतं मागत आहेत. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात सुद्धा कारगिल झालं. पण त्यांनी कधी त्याचा बाजार नाही मांडला.

- Advertisement -

हेच पक्ष पुन्हा नाणार रेटतील

नाणारबद्दल निवडुकीच्या तोंडावर सांगतील प्रकल्प रद्द केला. पण निवडणुका झाल्यानंतर हेच पक्ष नाणार रेटताना दिसतील. काही महिन्यांपूर्वी हे दोन्ही पक्ष एकमेकांना शिव्या घालत होते. अनेकांना वाटलं होतं की यांची युती होणार नाही. तेव्हाच म्हणालो होतो, योग्य वेळ येईल तेव्हा युती करतील. कारण दोघंही लाचार आहेत. तुमच्याशी या लोकांना काहीही देणंघेणं नाही.

कोकणाची केली केरळशी तुलना

केरळ आपल्या कोकणासारखंच आहे. पण ते आख्खं राज्य टुरीझमवर सुरू आहे. कोकण निसर्गाच्या बाबतीत केरळपेक्षा खूप पुढे आहे. इथून इतके आमदार-खासदार निवडून गेले. पण कोकणात काय बदललं? परदेशी पद्धतीने जर कोकणाचा विकास केला, तर फक्त कोकण आख्खा महाराष्ट्र जगवू शकेल इतकी ताकद आहे इथे. पण आमचे नेते स्वत:च्याच आयुष्यात इतके गुरफटून गेलेत, तर तुमच्याकडे कोण बघणार?

अमोल यादवचं विमान उडलंच नाही!

महाराष्ट्राच्या अमोल यादवनं संपूर्ण भारतीय बनावटीचं एक विमान बनवलं. सरकारनं ते मेक इन इंडियामध्ये सुद्धा दाखवलं. सरकारने याला सांगितलं पालघरमध्ये तुला जमीन देतो. ३५ हजार कोटी रुपये त्याच्या प्लँटमध्ये गुंतवतो असंही सांगितलं. पण त्याला ३ वर्षांत काहीही मिळालं नाही आणि आता हा अमोल यादव परदेशात जाऊन तिथल्या एका विमान कंपनीसोबत करार करण्याच्या तयारीत आहे.

नेते फोडायला कुठे कार्ड स्वाईप करता?

यावेळी राज ठाकरेंनी राष्ट्रवादी-काँग्रेसमधले नेते फोडण्याच्या पद्धतीवरून भाजपवर टीका केली. ‘इतके नेते फोडता इतर पक्षांमधले, जरा आम्हालापण दाखवा एटीएम कुठलं आणि कुठे स्वाईप करता?’ असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

इथे पाहा संपूर्ण भाषण!

? "राज ठाकरे" यांची जाहीर सभा रायगड येथून लाईव्ह || "Raj Thackeray" Live Speech – Raigad.#मोदीशाहीमुक्तभारत #राजठाकरे #रायगड #RajThackeray #Raigad #LokSabhaElections2019

Raj Thackeray ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 19, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -