नाणार प्रकल्प : परप्रांतीय जमीन खरेदीदारांची चौकशी करा – राजन साळवी

नाणार प्रकल्प असलेल्य क्षेत्रात जमिन खरेदीदारांची दुसरी यादी आज आपलं महानगरने जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद विधानसभेत पाहायला मिळाले. शिवसेना आमदार राजन साळवी यांनी सभागृहात ही यादीच वाचून दाखवली.

Nagpur
Strong Oppose for Nanar Project in Ratnagiri
नाणार प्रकल्पावरून विधान परिषदेत गोंधळ

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार व इतर परिसरामध्ये प्रास्तावित असलेल्या केंद्र सरकारच्या रिफायनरी प्रकल्पाच्या नियोजित जागेच्या ठिकाणी परराज्यातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या जमीन व्यवहारांची सरकारकडून चौकशी करण्यात यावी आणि त्या गैरव्यवहारा मधील दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी विधानसभेतील शिवसेनेचे राजापूर मतदारसंघाचे आमदार राजनजी साळवी यांनी सभागृहामध्ये केली.

Nanar Project Reality
नाणार प्रकल्पाची ‘आपलं महानगर’ने केलेली पोलखोल

विनाशकारी नाणार प्रकल्पसाठी राज्याबाहेरील नागरिकांनी २ हजार २०० एकर जमीन खरेदी केलेली आहे, असे सांगत साळवी यांनी आपलं महानगर दैनिकात आलेल्या बातमीमधील नावे वाचून दाखवली. ज्यांनी ही जमीन खरेदी केली त्यांच्याकडे शेतकरी असल्याचा कोणताही दाखला नाही, असे मत साळवी यांनी व्यक्त केले. त्यामुळे ही खरेदी संशयास्पद असून त्याची चौकशी करण्यात यावी आणि त्यात दोषी आढळल्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.


ही एक्सक्लुझिव्ह बातमी वाचण्यासाठी क्लिक करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब; ही घ्या नाणारची जमीन खरेदी करणार्‍यांची नावे

नाणारची ‘आपलं महानगर’ने केलेली पोलखोल विधानपरिषदेत गाजली