एलईडी दिव्यांनी उजळणार राजगुरूनगर

Mumbai
Led Lamps

वार्ताहर:-राजगुरुनगर शहर बुधवारपासून उजळणार असून नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील वाडा रस्त्यावर१३०० दिवे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे विजेवरील खर्च सुमारे ५० टक्क्यांपेक्षा कमी होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी दिली.राजगुरुनगर नगरपरिषदेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात बुधवारी नगर परिषदेत नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्षा वैशाली बारणे, नगरसेवक रफिक मोमीन, शंकर राक्षे, सचिन मधवे, मनोहर सांडभोर, राहुल आढारी, रेखा क्षोत्रीय, संपदा सांडभोर, स्नेहलता गुंडाळ, संध्या जाधव, सारिका घुमटकर, अर्चना घुमटकर, स्नेहल राक्षे, विद्युत अभियंता सुनील निकाळजे, स्वाती पाटील, ईईएसएल कंपनीचे गोकुळ शिंदे, अलोक कुमार, गणेश देव्हरकर, महेश घुमटकर यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी नागरिक उपस्थित होते वाडा रस्त्यावर शिवसेनाभवन ते गणेश वैभवपर्यंत ७० वॅटचे ५० दिवे बुधवारपासून बसविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरात लख्ख प्रकाश पसरणार आहे.

राजगुरुनगर नगर परिषदेच्या शहरातील विजेचा सरसरी १लाख ०८ हजार ०२७ युनिट वीज वापर होत होता. शहरातील वीज वापरावर तब्बल वर्षभरात ५४ लाख रुपये खर्च होत होते. पण आता एलईडी दिवे बसविल्यामुळे या खर्चात ५६ टक्के कपात होणार आहे. या एलईडी दिव्यांची ईईएसएल कंपनी सलग सात वर्षे देखभाल करणार आहे.

आजपासून राजगुरुनगरात दररोज दिवाळी असणार आहे. शहरातील सर्व रस्त्यांवर २० ते ७० वॅटपर्यंतचे एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. यामुळे वीजेत मोठी बचत होणार आहे. राजगुरुनगर शहरात नोव्हेंबर २०१७ मध्ये सर्वसाधारण सभेत ठराव केला होता. त्याला सर्वांनी मंजुरी दिली होती. मध्यंतरी शासनाचा निर्णय झाला होता कोणत्याची योजनेतून एलईडी लाईट बसवू नयेत. मात्र लगेचच दोन महिन्यांनी केंद्र आणि राज्य शासनात करार झाला त्यानंतर देशात एलईडी लाईट बसविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही योजना देशात कार्यान्वित झाली.
शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष, राजगुरुनगर नगरपरिषद

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here