बारामतीत यंदा इतिहास घडणार कांचन कुल जिंकणार – आठवले

महाराष्ट्रात ४० हून अधिक जागा युतीला मिळतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Pune
Ramdas Athawale
रामदास आठवले यांनी मात्र भगवा रंग बौद्ध धर्मातील भिख्खुंच्या वस्त्राचा आहे, भगवा रंग शौर्याचा आणि विजयाचा आहे, असे म्हणत या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

बारामती लोकसभा मतदार संघा भाजपसाठी खूप महत्वाचा आहे. या मतदारसंघातून भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीतील नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी बारामतीमध्ये यंदा इतिहास घडणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. ‘यंदा इतिहास घडण्याची शक्यता असून परिवर्तन घडून येईल, ती जागा आम्हीच जिंकू, असा अंदाज आठवले यांनी व्यक्त करत बारामतीत कमळ फुलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बारामतीत कमळ फुलणार

रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बारामती आणि राज्यातील भाजपा-शिवसेना महायुतीचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बारामती मतदारसंघात यंदा कमळ खुलणार आहे. ‘गतनिवडणुकीत बारामतीची जागा महादेव जानकर यांच्याकडे होती. त्यावेळी त्यांचे चिन्ह कपबशी होते. त्यांनी कमळ चिन्ह घेतलं असतं तर पाच ते दहा हजारांच्या मतांनी ते निवडून आले असते. परंतु, यंदा भाजपाकडून कांचन कुल या निवडणूक लढवत आहेत. यंदा परिवर्तन घडणार आहे. आम्ही यंदा बारामती देखील जिंकू’ असे आठवले यांनी सांगितले. तसंच महाराष्ट्रात ४० हून अधिक जागा युतीला मिळतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

मोदींची सत्ता पुढच्या १५ वर्ष काही केल्या जात नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता पुढील १५ वर्ष काही केल्या जात नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशभरात किती प्रचार केला. तरी देखील युपीएची सत्ता येणार नाही, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. मोदी फकीर असून राहुल फकीर नाहीत. त्यामुळे देशभरातील जनतेला राफेलवरून गाफील करू नये. हे लक्षात घेता राहुल गांधी यांनी लवकर लग्न करावं, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

वंचित बहुजन आघाडीचा परिणाम होणार नाही

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीच परिणाम होणार नसल्याचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. मी अनेक आघाड्या करुन युतीत आलो आहे. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही किंचित आघाडी असून तिचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तिसऱ्या आघाडीला जनता सत्तेत आणत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा युतीवर परिणाम होणार नाही. तसंत या आघाडीमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा हा युतीलाच होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here