घरमहाराष्ट्रबंद पडलेल्या घड्याळाकडे का जाऊ? - रामदास आठवले

बंद पडलेल्या घड्याळाकडे का जाऊ? – रामदास आठवले

Subscribe

कोल्हापूरमध्ये झालेल्या युतीच्या पहिल्या सभेमध्ये रामदास आठवलेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली.

आपल्या कवितांसाठी प्रसिद्ध असलेल्या रामदास आठवले यांनी महायुतीच्या पहिल्या सभेत आपल्या कवितांनी एकच हशा पिकवला. मात्र त्यांनी आपल्या कवितेतून शिवसेना भाजपाला टोला देखील लगावला. ‘उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची जमली आहे जोडी पण माझ्याकडे कुठे आहे लोकसभेची गाडी?’ अशी कविता रामदास आठवले यांनी म्हणत लोकसभेचे तिकीट न मिळाल्याची नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर जाहीर बोलून दाखवताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसेच ‘या दोघांनी एकत्र आले पाहिजे हे मी सारखे सांगत होतो. अखेर त्यांनी ते ऐकलं. आणि या महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोघे एकत्र आले’, असे देखील आठवले यावेळी म्हणालेत. तसेच ‘तुम्ही दोघांनी तुमचे वाद मिटवले म्हणून तुमच्या सोबत’, आल्याचे देखील रामदास आठवले यावेळी म्हणाले.

‘मला हवा कळते’

‘मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री असणार आणि हा पठ्ठ्या देखील त्या मंत्रीमंडळात असेल’, असा विश्वास बोलून दाखवत रामदास आठवलेंनी केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा एकदा मंत्रीपदाची अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, ‘मला हवा कोणत्या दिशेने चालते हे चांगलं कळतं. त्यामुळे आता हवा ही भाजपा आणि शिवसेनेच्या बाजूने आहे. त्यामुळे मी का जाऊ राष्ट्रवादीच्या बंद पडलेल्या घड्याळाकडे?’ असा उपरोधित सवाल देखील रामदास आठवलेंनी विचारला आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील जोरदार टीका केली. ‘काँग्रेस का सपना सपनाने तोड दिया है और हम राहुल गांधी का सपना तोडेंगे’, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -