घरताज्या घडामोडीफडणवीस ब्राह्मण नाहीत, तेही बहुजन; इति रामदास आठवले

फडणवीस ब्राह्मण नाहीत, तेही बहुजन; इति रामदास आठवले

Subscribe

भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश सध्या चांगलाच चर्चेत आहे. खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांचा बार उडवला आहे. आपण बहुजन असल्यामुळे आपल्यावर अन्याय झाला, असा एक आरोप खडसे सतत करत होते. याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी फडणवीस हे देखील बहुजन असल्याचा दावा केला आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबत वृत्त प्रसारित केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी रामदास आठवले आज जिल्ह्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी हा आश्चर्यजनक दावा केला.

एकनाथ खडसे यांच्याबाबत बोलताना आठवले म्हणाले की, खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा आम्ही शांत बसणार नाही. खडसे यांच्या जाण्यामुळे कोणताही फरक पडणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना संधीत देत अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आहे. तसेच खडसे यांनी त्यांच्यासोबत काही आमदार देखील भाजपमधून फुटणार असल्याचा दावा केला होता. त्यावर बोलताना आठवले म्हणाले की, “खडसे यांच्यासोबत कोणताही आमदार जाणार नाही. खडसे सध्या आमदार नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीत गेल्यावर त्यांना आमदारकी आणि मंत्रिपद मिळेल.”

- Advertisement -

खडसेंनी RPI मध्ये यायला हवे होते

खडसेंच्या राष्ट्रवादी मधील प्रवेशाबाबत बोलताना आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कोपरखळी मारली. “खडसेंना भाजप सोडायचाच होता, तर त्यांनी आरपीआयमध्ये यायला हवे होते.”, अशी मिश्किल प्रतिक्रिया आठवले यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -