‘आम्हाल एक तरी जागा द्या’; रामदास आठवलेंची याचना

शिवसेना-भाजपच्या जागा वाटपामध्ये आरपीआयचा देखील विचार करायला हवा होता, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. शिवसेना-भाजपने निदान एक तरी जागा आरपीआयला द्यावी, अशी याचिका आठवले यांनी केली आहे.

Mumbai
Ramdas Athawalesays give at least one seat to our party
शिवसेना-भाजपच्या जागा वाटपामध्ये आरपीआयचा देखील विचार करायला हवा होता, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. शिवसेना-भाजपने निदान एक तरी जागा आरपीआयला द्यावी, अशी याचिका आठवले यांनी केली आहे.

एका बाजुला ‘वंचित बहुजन आघाडी‘ स्थापन करुन प्रकाश आंबेडकर यांनी स्वाभिमान दाखवत सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादीला दिले असताना रामदास आठवले मात्र आरपीआयसाठी जागेची याचना करताना दिसत आहे. ‘लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला एक तरी जागा द्या’, अशी याचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपकडे केली आहे. सोमवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी युतीची घोषणा केली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी शिवसेना २३ तर भाजप २५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे ठरले आहे. तशी त्यांनी घोषणा देखील केली आहे. परंतु, जागावाटपात मित्रपक्ष असलेल्या आरपीआयचा विचार न केल्यामुळे रामदास आठवले नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती आठवले यांनी दिली आहे.

काय म्हणाले रामदास आठवले?

रामदास आठवले म्हणाले की, ‘आरपीआयला एकही जागा न दिल्यास शिवसेना-भाजपला दलित मताचा फटका बसेल. राज्यात आणि केंद्रात एनडीएला पुन्हा सत्ता मिळवायची असेल, तर आरपीआयची मदत घ्यावीच लागेल. त्यामुळे आमच्या पक्षाला एकतरी जागा द्या. यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेईल.’ यापुढे ते म्हणाले की, ‘शिवसेना, भाजप आणि आरपीआयने मिळून निवडणूक लढवल्यास महाराष्ट्रात लोकसभेच्या ४३ ते ४४ जागा जिंकता येतील. मी फक्त एका जागेची मागणी केली होती. मात्र, जागावाटपात आरपीआयचा विचर न केल्यामुळे महाराष्ट्रातील दलीत समाज नाराज झाला आहे. आंबेडकरी जनता माझ्यासोबत आहे.’


हेही वाचा – आंबेडकरी, बहुजन जनता माझ्यासोबत – रामदास आठवले

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here