रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते

उदयनराजेंच्या टीकेला शरद पवार यांचे उत्तर

Mumbai
udayanraje bhosale and sharad pawar
उदयनराजे भोसले आणि शरद पवार

सातारा=मला ‘जाणता राजा’ म्हणा असे मी कुठेही, कोणालाही म्हटलेले नाही. पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा कुणी नीट अभ्यास केला तर त्यांना हे ज्ञात होईल की छत्रपती यांची उपाधी ‘शिवछत्रपती’ ही होती, ‘जाणता राजा’ अशी कधीच नव्हते. ‘जाणता राजा’ हे बिरुद रामदास स्वामींनी शिवरायांना दिले आणि मी हेही सांगतो की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, तर त्यांच्या गुरू राजमाता जिजाऊ होत्या. शिवरायांचे व्यक्तिमत्त्व जिजाऊंनी घडवले आहे,’ असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

माजी खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी जाणता राजा या उपाधीवरून साधलेल्या निशाण्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर भाष्य केले आहे. खटाव- माण साखर कारखान्याच्या 251001 व्या साखर पोत्याचे पूजन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवारांनी जाणता राजा यावरून उदयनराजेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.

याशिवाय इथे आल्यापासून सगळे पत्रकार प्रतिक्रियेसाठी माझ्या मागे लागले आहेत. मात्र मी तरी कोणाला बोललो नाही. रामराजे निंबाळकर हे उदनयराजेंवर बोलायला पुरेसे आहेत. मी कुठेच नाही म्हणालो, मला जाणता राजा म्हणा. शिवचरित्राचा व्यवस्थित अभ्यास केल्यास जाणता राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना कधीच लावण्यात आली नव्हती. शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास स्वामी नव्हते. तर जिजाऊ या गुरू होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते ही लेखणीची कमाल. लेखणीची छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी, असं म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंना उत्तर दिलं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here