घरमहाराष्ट्रराणेंना स्वाभिमान पक्ष भाजपत विलीन करायचाय

राणेंना स्वाभिमान पक्ष भाजपत विलीन करायचाय

Subscribe

ज्येष्ठ नेते नारायण राणे आमच्या सोबतच आहेत. मला त्यांनी पुस्तक प्रकाशनाला बोलावते होते. पण त्यावेळेत मला कार्यक्रमाला जाणे शक्य झाले नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना त्यांचा पक्ष भाजपत विलिन करायचा आहे, असा गौप्यस्फोट केला. महाजनादेश यात्रेत धुळे येथे ते मीडियाशी बोलत होते. नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय त्यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता.

आता त्यांना आपला पक्ष भाजपत विलिन करायचा आहे. या वेळचा आमचा विजय हा महाराष्ट्रातला अभूतपूर्व विजय असेल. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व घटक पक्षांना अगोदर जागावाटप करून मग आम्ही आमचे जागावाटप करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

ईडीच्या चौकशीशी संबंध नाही
राज ठाकरे सगळीकडे पराभूत झाले आहेत. ते राजकीयदृष्ठ्याही पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांची मुद्दाम चौकशी करण्यात काय फायदा? असा सवाल करतानाच त्यांच्यावर काहीही आले तर त्याचा ते राजकारणाशी संबंध लावतात. ईडीच्या चौकशीचाही तसाच संबंध लावण्यात आला असेही फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. लोकसभा निवडणुकीत राज यांनी जिथे जिथे सभा घेतल्या तिथे आघाडीचे उमेदवार पराभूत झालेत, असेही फडणवीस यांनी सांगितले. राज यांच्याबद्दल उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेले मत त्यांचे ते वैयक्तिक मत आहे. भाजप-शिवसेनेनंतर वंचित आघाडीकडे जनतेचा ओढा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -