घरमहाराष्ट्रजालना मतदारसंघात दानवे इन खोतकर 'आऊट'

जालना मतदारसंघात दानवे इन खोतकर ‘आऊट’

Subscribe

जालना लोकसभा मतदार संघातून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी निश्चित झाली असून, पहिल्या यादीत दानवेंचा समावेश आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून मराठवाड्यातील युतीच्या समन्वयकपदी अर्जुन खोतकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिवसेने ही नवीन जबाबदारी दिल्याने खोतकर पुरते अडचणीत सापडले आहे.

जालना लोकसभा मतदार संघात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढणार, अशी डरकाळी फोडणाऱ्या अर्जुन खोतकर यांना आता आपली तलवार मॅन करावी लागली आहे. त्याचे कारण म्हणजे जालना लोकसभा मतदार संघातून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी निश्चित झाली असून, पहिल्या यादीत दानवेंचा समावेश आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून मराठवाड्यातील युतीच्या समन्वयकपदी अर्जुन खोतकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिवसेने ही नवीन जबाबदारी दिल्याने खोतकर पुरते अडचणीत सापडले आहे. गेल्या काही दिवसांपासून युती झाल्यानंतरही आपण राव साहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढणार अशी भूमिका राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी घेत जालनाच्या जागेवर दावा केला होता.

खोतकर काय घेणार भूमिका

तसेच यासंदर्भात खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द अंतिम राहील असे त्यांनी सांगत ‘मी अजून माघार घेतली नसल्याचे’ देखील सांगितले होते. मात्र भाजपाकडून दानवे यांचे नाव निश्चित झाल्याने खोतकर नेमकी काय भुमिका घेणार आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

गुंता अधिकच वाढला

लोकसभा उमेद्वारीवरुन नाराज झालेल्या अर्जुन खोतकरांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती केली होती. खोतकरांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना खोतकरांकडे पाठवले होते. मात्र, त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरल्याचे भेटीनंतर समोर आले आहे. खोतकर आणि दानवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी बंद दाराआड झालेल्या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. या चर्चेनंतरही खोतकर दानवे यांच्या विरोधात लोकसभा लढण्यावण्याच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे गुंता अधिकच वाढला आहे.

नेमका वाद काय?

खोतकर यांनी दानवे यांच्या विरोधात जालन्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. दरम्यान, ही सेना-भाजपच्या युतीनंतर खोतकर ही घोषणा मागे घेतील अशी चर्चा रंगली होती. मात्र, दानवेंविरोधात निवडणूक लढवणार या निर्णयावर खोतकर ठाम राहिले. त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण पसरले. दरम्यान, त्यांच्यातील हा वाद मिटावा यासाठी भाजपकडून हालचाली सुरु होत्या. याच कारणास्तव सुभाष देशमुख यांनी जालना येथे खोतकरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट देखील घेतली होती. यावेळी दानवे देखील स्वत: त्यांच्यासोबत होते. या तिनही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा सुरु होती. मात्र, या चर्चेअखेरी कोणताच ठोस तोडगा निघाला नाही.

- Advertisement -

वाचा – मोदीविरोधात देशभरातले तर माझ्या विरोधात जालन्यातील चोट्टे एकत्र – रावसाहेब दानवे

वाचा – खोतकरांना उमेदवारी द्या, अन्यथा दानवेंना मदत करणार नाहीत – शिवसैनिक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -