घरमहाराष्ट्रमोदीविरोधात देशभरातले तर माझ्या विरोधात जालन्यातील चोट्टे एकत्र - रावसाहेब दानवे

मोदीविरोधात देशभरातले तर माझ्या विरोधात जालन्यातील चोट्टे एकत्र – रावसाहेब दानवे

Subscribe

'पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चोट्टे एक झाले', असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केले आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच अडचणीत येणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चोट्टे एक झाले आहेत, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केले आहे. दानवेंनी विरोधाकांचा उल्लेख ‘चोट्टे’ म्हणजेच चोर असा केला आहे. त्यांची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या ठिकाणी ते बोले

जालन्यात प्रभाग क्रमांक ११ मध्ये विकास कामांच्या बैठकीत बोलताना रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी तुम्ही माझ्या मागे उभं राहण्यासाठी ‘मी तुम्हाला पैसे देतो आणि त्यांना (विरोधकांना) पैसे भेटू नाही राहिले’, असंही वक्तव्य केलं आहे.

- Advertisement -

काय म्हणाले रावसाहेब दानवे

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लीपमध्ये रावसाहेब दानवे उपस्थितांनी विचारताना दिसत आहेत, की मोदींना पंतप्रधान करणार का?…पुढे ते म्हणाले की,’कोणी काहीही म्हणो काहीही सांगो…देशातले सगळे चोट्टे एक झाले आहेत आणि मोदींना होऊ नका सांगू लागले आहेत. आपल्याकडेही सगळे चोट्टे एकत्र झाले आहेत आणि रावसाहेब दानवेला पाडू असं म्हणू लागलेत. का तर मी मोदींजीचा माणूस आहे’.

या निवडणुकीत आम्ही त्यांना उत्तर देऊ

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर आमदार बच्चू कडू यांनी टीका केली आहे. रावसाहेब दानवे हे कसे आहेत हेच कळत नाही? रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आहे. आपण काय बोलावं याचं भान असलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठी चुकीची भाषा वापरुनही पक्षाकडून त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली नव्हती. या निवडणुकीत आम्ही त्यांना उत्तर देऊ’, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – युती व्हावी ही जनतेची इच्छा – रावसाहेब दानवे

हेही वाचा – राहुल गांधींनी देशाची माफी मागा – रावसाहेब दानवे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -