Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी महाराष्ट्र हादरला, चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार

महाराष्ट्र हादरला, चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार

गोंदियावरुन पुण्याला जाणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Related Story

- Advertisement -

बलात्कार करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच नाही तर महाराष्ट्रातही अशा घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशीच एक घटना महाराष्ट्रात घडली आहे. गोंदियावरुन पुण्याला जाणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे.

नेमके काय घडले?

गोंदियावरुन पुण्याला जाणाऱ्या एका खासगी बस ट्रॅव्हल्समधून २४ वर्षीय तरुणी प्रवास करत होती. ती तरुणी एका सीटवर जाऊन बसली. दरम्यान, आरोपीने ही तुमची सीट नसल्याचे सांगत तुम्ही मागच्या सीटवर जाऊन बसा, असे सांगितले. पीडिती मागच्या सीटवर जाऊन बसल्यानंतर आरोपींनी तिला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. तसेच घडलेल्या घटनेची वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकी आरोपीने पीडितीला दिली. ही घटना ६ जानेवारी रोजी घडल्याचे उघडकीस आले आहे. परंतु, तरुणीचं मानसिक स्वास्थ खचलं होतं. पीडित तरुणीने पुण्यात पोहोचताच पोलिसांत तक्रार दिल्याने घडलेला सारा प्रकार उघडकीस आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, पुणे पोलिसांनी वाशिम पोलिसांकडे गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी घडलेल्या घटनेमधील गुडविल्स कंपनीची ट्रॅव्हल्स जप्त केली आहे. तसेच संबंधित आरोपी समीर देवकर असल्याचं पोलिसांनी सांगितले असून याप्रकरणी मालेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा – अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, सहाजण ताब्यात


- Advertisement -