घरताज्या घडामोडीअश्लिल फोटो, व्हिडीओ व्हायरलची धमकी देत बलात्कार; एकाला अटक

अश्लिल फोटो, व्हिडीओ व्हायरलची धमकी देत बलात्कार; एकाला अटक

Subscribe

प्रेमाच्या जाळ्यात ओढत एकाने तरूणीवर बलात्कार करत अश्लिल फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल साडेपाच वर्ष वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, संशयिताने तरूणीकडून ७० हजारांची रोकडही घेतली आहे. पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जावेद युनूस शेख (२४, रा. लोणकर मळा, जय भवानी रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, शेख याचे परिसरातील तरूणीशी मैत्री होती. काही दिवसांनी मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. शेख याने तरुणीस महामार्गावरील लॉजिंगमध्ये नेत बलात्कार केला. तसेच, अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काढले. त्याआधारे त्याने तरुणीला ब्लॅकमेल करणे सुरू केले. जानेवारी २०१४ ते जून २०२० या साडेपाच वर्षांच्या कालावधीत शेख याने तरुणीच्या आईवडिलांसह मित्रांना फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जात तिच्यावर बलात्कार केला. या काळात संशयिताने तरूणीकडून ७० हजार रूपयांची रोकडही घेतली. पुढील तपास उपनिरीक्षक तेली करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -