घरमहाराष्ट्रवाशिमजवळ चालत्या बसमध्ये तरुणीवर क्लिनरचा बलात्कार

वाशिमजवळ चालत्या बसमध्ये तरुणीवर क्लिनरचा बलात्कार

Subscribe

महिला अत्याचाराच्या घटना राज्यात दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशात आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणासारखे प्रकरण वाशिममध्ये घडले आहे. मात्र, या घटनेत पीडितेचे नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली. नागपूरवरुन वाशिममार्गे पुण्याला जाणार्‍या एका 21 वर्षीय तरुणीवर चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्समध्ये बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी गोंदिया जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. ही घटना सहा जानेवारीची आहे. पीडित मुलीने पुण्यात पोहोचल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी हा या बसचा क्लिनर असून त्याचे नाव समीर देवकर असे आहे.

21 वर्षीय तरुणीवर चालत्या ट्रॅव्हल्समध्ये वाशिमच्या मालेगाव परिसरात बलात्कार केल्याचे समोर आले आहे. वाशिमच्या मालेगाव पोलीस ठाण्यात सदर बस जप्त केली आहे. माहितीनुसार गोंदियाची ही पीडित तरुणी नागपूरवरून पुण्याला जाण्यासाठी निघाली होती. मात्र, वाशिमच्या कारंजा दरम्यान गाडीच्या क्लिनरने त्या पीडित तरुणीला तुमची सीट ही नसल्याचे सांगून मागच्या सीटवर बसवले. त्यानंतर तरुणीला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन दोन वेळा बलात्कार केला. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकीही दिली.

- Advertisement -

दरम्यान, पुणे पोलिसांनी वाशिम पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला असून पोलिसांनी घडलेल्या घटनेमधील गुडविल्स कंपनीची ट्रॅव्हल्स जप्त केली आहे. आरोपी समीर देवकर हा फरार असून त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -