घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या विंचूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्तारोको

नाशिकच्या विंचूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्तारोको

Subscribe

नाशिकमधील विंचुर चौफुला येथील तीन पाटी बस स्टॅण्डवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार यांच्या नेतृत्वाखाली आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

नाशिकमधील विंचुर चौफुला येथील तीन पाटी बस स्टॅण्डवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार यांच्या नेतृत्वाखाली आज, शनिवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे सरकारच्या शेतकरी धोरणाबाबत परखड मतं मांडली. सुमारे दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे नाशिक, औरंगाबाद आणि लासलगावकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. आता हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.

विविध मागण्यांसाठी आंदोलन 

शनिवार, २ मार्च रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीन पाटी स्टॅण्डवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कांद्याला हमीभाव द्यावा, द्राक्षाचा पीकविम्यात समावेश करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांना वीजबिले माफ करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, विजेचे लोडशेडिंग बंद करून दिवसा वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च व अधिक पन्नास टक्के नफा मिळवून हमीभाव द्यावा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आंदोलकांनी यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने तलाठी सागर शिर्के यांना मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, माजी आमदार धनराज महाले, संजय ठक्कर, तालुका अध्यक्ष अनिल कुंदे, राजेंद्र बोरगुडे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – 

पाकचा कांगावा; पुलवामा हल्ल्यामध्ये ‘जैश’चा हात नाही

पाकिस्तानचे षडयंत्र; सुरक्षा दलाच्या रेशन स्टॉकमध्ये ‘विष’ टाकण्याचा प्लॅन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -