घरमहाराष्ट्रएसटी आणि हॉटेल चालकांचे दर वाढले

एसटी आणि हॉटेल चालकांचे दर वाढले

Subscribe

कात्री प्रवाशांच्या खिशाला

एसटी महामंडळाचा महसूल वाढावा आणि सोबतच एसटीच्या प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी यासाठी राज्यभरात अधिकृत हॉटेलांमध्ये प्रवाशांसाठी एसटीचा थांब्या देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. त्यासाठी हॉटेल मालकांकडून एसटीला प्रत्येक फेरीवर वेगवेगळ्या वाहनांचे दर सुद्धा मिळत आहेत. मात्र आता एसटी महामंडळाने पुन्हा या थांब्यांचे दर वाढवले आहेत. त्यामुळे आता हॉटेल मालक खाद्यपदार्थांचे दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा सरळ फटका एसटीच्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.

खासगी वाहतुकीच्या तुलनेत एसटी महामंडळाने एसटीच्या प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी 30 रूपयांमध्ये चहा-नाश्त्याची योजना सुरू केली आहे. त्यासाठी एसटीने राज्यात 50 अधिकृत थांबे निवडले आहेत. त्याठिकाणी असलेल्या हॉटेलांमध्ये तिकीट दाखवल्यानंतर प्रवाशांना प्रसाधनगृहाची सोय आणि चहा-नाश्ताची अल्प दरात सेवा मिळत आहे. एसटीला प्रत्येक फेरी मागे अधिकृत हॉटेल मालकांकडून दर सुद्धा मिळत होते. त्यामुळे एसटीच्या महसूलात वाढ झाली होती. सोबतच एसटीच्या प्रवाशांना सुद्धा मोठ्या प्रमाणात सुविधा मिळत होत्या.

- Advertisement -

व्होल्वो, निमआराम आणि साध्या एसटीच्या हॉटेलांमध्ये थांब्यासाठी हॉटेल चालकांना अधिक पैसे द्यावे लागणार आहेत. ही दरवाढ २५ मेपासून राज्यभर लागू होणार आहे. पुढील दोन वर्षांसाठी नवे करार करण्यात येणार आहे. नव्या करारानुसार हॉटेल चालकांना सुरक्षा अनामत सुद्धा वाढविण्यात आली आहे. मुंबई- पुणे द्रुतगती मार्ग १२ लाख ८६ हजार १० रुपये हॉटेल मालकांना एसटी महामंडळात सुरक्षा अनामत रक्कम भरायची आहे. त्यामुळे आता हॉटेल चालक एसटी प्रवाशांना चहा-नास्ताचे दर वाढविण्याची मागणी करत आहेत, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली आहे.

असे आहेत दर

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील थांब्यांसाठी एसटीने नवे दरपत्रकही जाहीर केले आहे. त्यात येथील चालकांकडून थांबा आकार रक्कम म्हणून व्होल्वोसाठी २७५ रुपये अधिक ५० रुपये जीएसटी असे एकूण ३२५ रुपये आकारले जातील. तर निमआराम गाड्यांसाठी १६७ रुपये अधिक जीएसटी असे एकूण २०८ रुपये आणि साध्या एसटीची १३२ रुपये अधिक २४ रुपये जीएसटी असे एकूण १५६ रुपये आकारले जातील.

- Advertisement -

प्रवाशांच्या तक्रारी

एसटी महामंडळाने हॉटेल थांब्यावर 30 रूपयांमध्ये चहा-नाश्त्याची योजना सुरू केली आहे. त्यासाठी एसटीने राज्यात काही अधिकृत थांबे निवडले आहेत. हॉटेलमध्ये तिकीट दाखवल्यानंतर प्रवाशांना प्रसाधगृहाची सोय आणि चहा-नाश्ताची अल्प दरात सेवा मिळत आहे. मात्र त्यासाठी एसटीने 2016 मध्ये काढलेल्या परिपत्रकात चहा-नाश्त्याची वेळ आणि त्याच प्रमाणे किती यासंदर्भात उल्लेख नाही. त्यामुळे अधिकृत थांब्यांवरील हॉटेलमध्ये प्रवाशांना चहा-नाश्त्याची सुविधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी ही सुविधा प्रवाशांना मिळत असली तरी, चहा-नाश्त्याचे प्रमाण अद्याप एसटीने स्पष्ट केले नसल्याने, प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

असे मिळते एसटीला उत्पन्न
बस प्रकार – जुने दरनवीन दर
शिवशाही 236 रू. -260 रू.
निमआराम 189 रू.- 208 रू.
साधी बस 142 रू. -156 रू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -