राऊतांनी गुंडांना घरी बसवले; ठाकरेंची राणेंवर बोचरी टीका

आम्हाला गुंड नकोत खासदार हवे आहेत, असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंना टोला लगावला.

Mumbai
shivsena
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रत्नागिरी येथे जाहीर सभा घेतली. खासदारांचे शिक्षण काढता. शिक्षण काय संतानी घेतले होते का? बहिणाबाई न शिकता त्यांनी मोठी उंची गाठली. विनायक राऊत यांनी कधीही हातातला झेंडा बदलला नाही. निष्ठा हवी असते. समोरच्या उमेदवाराकडून तुम्ही काय निष्ठेची अपेक्षा ठेवता, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर केली. या मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे निवडणूक लढवत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला एक परंपरा आहे. या आधी इथे गुंड होते, विनायक राऊत यांनी गुंडगिरी मोडीत काढलीत. आम्हाला गुंड नकोत खासदार हवे आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंना टोला लगावला.

आघाडी सरकारमध्ये a टू z घोटाळे 

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीलाही टीकेचं लक्ष्य केलं. कस खायचं हे यांच्या समोरच्याकडून शिकावे. a टू z इतके घोटाळे आहेत. राहुल गांधी हे १२४ ए हा देशद्रोहाचे कलम काढणार असे त्यांच्या जाहीरनाम्यात आहे. तुम्हाला देशद्रोह्यांना फासावर लटकवणारे सरकार पाहिजे की पाठीशी घालणार सरकार पाहिजे अशी टीका उद्धव यांनी काँग्रेसवर केली. तर शरद पवार बोलतात की गांधी घराण्याचा आदर केला पाहिजे. आम्ही त्या काँग्रेसला मानतो ज्यांनी स्वातंत्र्यसाठी लढा दिला. आम्ही त्या काँग्रेसला मानतो ज्यांनी स्वातंत्र्यसाठी लढा दिला. त्यांना पाहून मान आदरानं वर येते आणि आता मान शरमेने खाली जाते. नेहरू, महात्मा गांधी अनेक क्रांतिकारकांनी जर हाल भोगले नसते तर राहुल गांधी पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहू शकले असते का? असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here