घरमहाराष्ट्रराज्यभर बंडोबांचे बंड कायम

राज्यभर बंडोबांचे बंड कायम

Subscribe

कोकणात सर्वाधिक बंडखोरी

उमेदवारी मागे घेण्याच्या कालच्या अखेरच्या दिवशीही अनेक उमेदवारांनी आपल्या मूळ पक्षाच्या नेत्यांना ठेंगा दाखवला. अनेकांचे मोबाईल नॉट रिचेबल होते तर बरेचजण सकाळपासूनच घराबाहेर होते. या बंडखोरांमुळे राज्यात भाजप-सेनेच्या अनेक उमेदवारांपुढचे संकट अधिक गहिरे बनले आहे. विधानसभेच्या या निवडणुकीत सर्वाधिक बंडखोरी ही कोकणात झाल्याचे उघड झाले आहे.

कणकवलीत नुकतेच भाजपवासी झालेल्या नितेश राणे यांना सेनेच्या सतीश सावंत यांना सामोरे जावे लागणार आहे. विशेष म्हणजे शेवटच्या क्षणी भाजपचे स्थानिक नेते संदेश पारकर यांनी सेनेशी जवळीक करत सतीश सावंत यांना पाठिंबा जाहीर केल्याने राणे यांची अडचण वाढेल, असे दिसते. राणेंपुढे सेनेने निर्माण केलेली अडचण लक्षात घेऊन कुडाळमध्ये सेनेचे वैभव नाईक यांच्याविरोधात महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी बंडखोरी केली आहे. या दोघांमध्ये कुडाळची निवडणुकीतील मुख्य लढत असेल. सावंतवाडीत विद्यमान गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनाही भाजपचे राजन तेली यांना सामोरे जावे लागणार आह

- Advertisement -

रत्नागिरीतून चारही मतदारसंघातल्या बंडखोरांनी आपले अर्ज काल मागे घेतले. उरण मतदारसंघात सेनेचे मनोहर भोईर यांच्या विरोधात भाजपचे महेश बालदी यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. यामुळे भोईर यांच्यापुढे डोकेदुखी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे बालदी यांची उमेदवारी भरण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर हजर होते. मुंबईत वांद्रे पूर्व मतदारसंघात सेनेचे मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या विरोधात सेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती बाळा सावंत यांनी बंडखोरी केली आहे.

अंधेरी पूर्व संघात सेनेचे आमदार रमेश लटके यांच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी तर वर्सोवा येथे भाजपच्या भारती लव्हेकर यांच्या विरोधात सेनेच्या नगरसेविका राजूर पटेल, यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. मानखूर्दमध्ये काँग्रेस आघाडीचे उमेदवर सपाचे अबू असीम आझमी यांच्या विरोधात काँग्रेसच्या सुफीयन वणू यांनी उमेदवारी भरली आहे.

- Advertisement -

अहमदनगरमधील कोपरगाव विधानसभा मतदारसंघात भाजपविरोधात नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि विखे-पाटील यांचे नातलग राजेश परजणे यांनी आपले अर्ज कायम राखले. पुण्यात चिंचवड मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविरोधात राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. कसबा पेठ मतदारसंघात सेनेचे विशाल धनवडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपच्या उमेदवार महापौर मुक्ता टिळक यांंना बंडखोरीला तोंड द्यावे लागणार आहे. कल्याण(प) मध्ये शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांच्या विरोधात विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी आपला अर्ज कायम ठेवला. यामुळे म्हात्रे यांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -